पुणे: कात्रज सिलेंडर स्फोट प्रकरणी ४ जणांवर गुन्हा दाखल

पुण्यात मंगळवारी कात्रज भागात झालेल्या सिलेंडर स्फोटप्रकरणी पुणे पोलिसांनी 4 जणांवर गुन्हा दाखल केलाय. सागर पाटील हा सिलेंडर व्यावसायिक असून, जागेच्या मालकासहीत आणखी दोघांवर भादंवि (भारतीय दंड संहिता विधान) कलम 436, 308 आणि 285 अन्वये कारवाई करण्यात आलीय.

कात्रजच्या गंधर्व लॉन्स परिसरात आतिशय दाट रहिवासी भागात एका पत्र्याच्या शेडमध्ये 100 सिलेंडरचा साठा करण्यात आला होता. तिथे अचानक स्फोट झाला. स्फोट होत असताना जवळच लहान मुले खेळत होती. त्यामुळे रहिवाशी भेदरले होते. अरुंद रस्ते असल्याने येथे अग्निशमन दल पोहोचण्यासाठी अडचणी आल्या. आगीचे लोळ दुरवरुनही दिसत होते. मात्र सुदैवाने जिवितहानी झालेली नाही.

जेव्हा आग लागली तेव्हा तिथे रहिवासी असलेले कात्रज फायरब्रिगेडचे जवान निलेश राजीवडे नुकतेच ड्युटी संपवून परतले होते. त्यांना नागरिकांनी फोन करुन कळवताच ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पेट घेत असलेल्या 7 ते 8 सिलेंडर बाहेर काढले.

ज्या ठिकाणी हे गॅस सिलिंडरचे गोडाऊन आहे. त्याच्यालगत खुले प्लॉट्स असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत सिलेंडरचा साठा करण्यात आला होता. 141 छोटे तर 26 मोठे गॅस सिलेंडर होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply