राज्याच्या शिक्षण आयुक्तपदी नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे

पुणे - नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची राज्याच्या शिक्षण आयुक्तपदी (Education Commissioner) नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन वर्षे कार्यकाळ झालेल्या अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने नऊ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान मावळते शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्या नव्या जबाबदारीबद्दल अजूनही प्रशासन संभ्रमात आहे. या बदल्यामध्ये डॉ. संजय चहांदे, ए.एम लिमये, एसए तागडे, आभा शुक्ला, डॉ. अमित सैनी, आर.एस. जगताप, विवेक भीमानवार, राहुल द्विवेदी आणि गंगाधरन देवराजन यांचा समावेश आहे. सूरज मांढरे यांनी १२ मार्च २०१९ रोजी नाशिकच्या जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यांनी जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती हाताळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसंच त्यांनी या कार्यकाळात सेवा आणि कायदा आणला गेला. तसंच नाशिक जिल्ह्यातील ५८ मुलांना शासकीय मदत दूत योजनेतून मदतीचा हात पुढे करत त्यांचं पालकत्व स्वीकारलं होतं. त्यांच्या या कामासाठी नुकताच त्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरवही करण्यात आला आहे. नाशिकच्या जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार आता गंगाधरन डी. पाहणार आहे. गंगाधरन डी हे याआधी मंत्रालयात मुख्यसचिवांचे उपसचिव म्हणून काम करत होते.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply