पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या खर्चाचा मेळच नाही

  पुणे - पुणे महापालिकेच्या (Pune Municipal) भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयासाठी (Medical College) वर्षाला किती कोटी खर्च (Expenses) येणार याचा मेळच अद्याप प्रशासनाने (Administrative) घातलेला नाही. प्रशासनाकडून अर्धवट माहिती पुरविल्याचे (ता. ९) बैठकीत महाविद्यालयाचे शुल्क (College Fee) निश्‍चीत झाले नाही. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता देताना त्यासाठी १०० प्रवेशासाठी परवानगी दिल्याने महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता महाविद्यालयाची शुल्क निश्‍चीती करणे, प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्‍यक परवानगी घेणे, विद्यार्थ्यांसाठी सुविधा पुरविणे या कामांना गती येणार आहे. ‘वैद्यकीय महाविद्यालये शुल्क निश्‍चित करण्यासाठी (ता. ९) बैठक झाली. शुल्क किती असावे, कर्मचारी भरती, महाविद्यालय सुरू करतानाची तयारी यावर चर्चा खूप झाली, पण प्रशासनाकडून व्यवस्थित माहिती मिळाली नाही. वर्षाचा एकूण खर्च किती याची इत्थंभूत माहिती तयार केली जात आहे. त्यामुळे यावर पुन्हा एकदा शुक्रवारी (ता. ११) बैठक होणार आहे.’ - मुरलीधर मोहोळ, महापौर.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply