पुणे : इ-बाइक स्टेशनसाठी नियमावलीला फाटा

पुणे - खासगी कंपनीतर्फे शहरात इ-बाईक स्टेशन (e-bike station) उभारण्यासाठी तब्बल ७८० ठिकाणी जागा  दिली जाणार आहे. मात्र, या जागा देताना जागा वाटप नियमावलीला फाटा देऊन त्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर (Standing Committee) ठेवण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होणार असल्याने यावर विरोधकांनी आक्षेप घेऊन अनेक प्रश्‍न उपस्थित केले. तसेच तासभर यावरून स्थायी समितीचे कामकाज ठप्प झाल्याने अखेर यावर निर्णय न घेता प्रस्ताव पुढे घेण्यात आला. वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी इ-व्हेईकलची चर्चा आहे. शहरात नागरिकांना इ-बाईक उपलब्ध व्हावी यासाठी निविदा मागवली होती, त्यामध्ये मे. व्हिट्रो मोटर्स प्रा. लि. या कंपनीला हे काम देण्यात आहे. त्यासाठीचा प्रस्ताव आज (ता. ११) आयत्यावेळी स्थायी समितीसमोर मांडण्यात आला. या कंपनीतर्फे शहरात ७८० जागी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. त्याठिकाणी जाहिरात करण्याचे हक्कही या कंपनीला दिले जाणार आहेत. त्यासाठी आकाशचिन्ह विभागातर्फे वर्षाला २२२ चौरस मीटर इतके शुक्ल आकारले जाणार आहे. ही कंपनी प्रत्येक जागेसाठी वर्षाला सुमारे १ लाख रुपये भाडे, तसेच सर्व स्टेशनसाठी लमसम रक्कम तीन लाख आणि एकूण नफ्याच्या २ टक्के नफा महापालिकेला दिला जाणार आहे. या जागा पुढील ३० वर्षासाठी दिली जावी असा प्रस्ताव स्थायी समितीला सादर करण्यात आला.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply