नागरीकांचा वेळ वाचविण्यासाठी पुणे वाहतुक पोलिसांकडून उपाययोजना

पुणे - वाहतुकीच्या नियमांचे  उल्लंघन केले नसतानाही अनेक नागरीकांना वाहतुक शाखेकडून दंडाची रक्कम भरण्याकरीता मेसेज प्राप्त झाले. त्यामुळे हजारो नागरीकांकडून दररोज वाहतुक शाखेचे कार्यालयात गर्दी केली जात आहे. संबंधित नागरीकांचा वेळ वाचावा, त्यांचा ताण कमी व्हावा, यासाठी वाहतुक पोलिसांकडून मोबाईल ऍपद्वारे (Mobile App) तक्रारी करण्यास सांगितले आहे. त्याद्वारे नागरीकांच्या तक्रारींचे निरसन गेले जाणार असल्याचे वाहतुक पोलिसांनी सांगितले. शहर वाहतुक शाखेतर्फे सीसीटीव्ही कक्षामार्फत शहरातील वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. त्यानुसार, ई-चलान पद्धतीद्वारे संबंधित वाहनचालकास दंडाची रक्कम भरण्याबाबतचे मेसेज पाठविले जातात. तर, दुसरीकडे याच ई-चलान पद्धतीच्या तांत्रिक चुकीमुळे अनेक नागरीकांनी नियमांचे उल्लंघन केलेले नसतानाही त्यांना ई-चलानचे मेसेज येत आहेत. त्यामुळे असंख्य नागरीक त्रस्त असून अनेक नागरीक हि तांत्रिक चुक सुधारण्यात यावी, आपल्या नावावर आलेला दंड रद्द व्हावा, यासाठी वाहतुक शाखेच्या येरवडा येथील पोलिस उपायुक्त कार्यालयाकडे जात आहेत. दरम्यान, या प्रकारामुळे नागरीकांना होणारा त्रास टाळण्यासाठी, त्यांचा वेळ वाचावा यासाठी वाहतुक शाखेकडून मोबाईल ऍपद्वारे तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरमधून mahatrafficaap हे मोबाईल ऍप्लिकेशन डाऊनलोड करावे. त्यामध्ये grievance या टॅबवर नागरीकांनी चुकीच्या चलनाबाबत ऑनलाईन तक्रार करावी. तसेच वाहतुक शाखेच्या @punetrafficpolice या ट्विटर खात्यावर किंवा 8411800100 या व्हॉटसअप क्रमांकावर आपली तक्रार नोंदवावी. या माध्यमाद्वारे आलेल्या तक्रारींची दखल घेऊन त्यांचे तत्काळ निरसन करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 'वाहतुकीच्या नियमभंगाबाबत आलेल्या चुकीच्या चलनाबाबत नागरीकांनी मोबाईल ऍप, ट्विटर, व्हॉटसअप यावर तक्रारी कराव्यात. त्यांचे वाहतुक शाखेकडून निरसन केले जाईल. त्यामुळे नागरीकांचा वेळ व मानसिक त्रास वाचेल.' - राहुल श्रीरामे, पोलिस उपायुक्त, वाहतुक शाखा.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply