Pune Crime : ११ वर्षांच्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार, डान्स टीचरला अटक; पुण्यातील संतापजनक घटना

Pune : पुण्यामध्ये ११ वर्षांच्या विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे शहरातील कर्वनगरमध्ये असलेल्या एका नामांकित शाळेमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी शिक्षकाला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. विद्यार्थ्यांचे समुपदेशन सुरू असताना हा सर्व प्रकार समोर आला. या घटनेप्रकरणी संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कर्वेनगर परिसरात एका नामांकित शाळेत विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना डान्स शिकवणाऱ्या शिक्षकाने हे घाणेरडे कृत्य केले आहे. ११ वर्षांच्या विद्यार्थ्याने त्याच्यासोबत घडलेला हा सर्व प्रकार समुपदेशन सुरू असताना सांगितला.

Pune News : चालकाला फिट आली अन्..., पुणे-सोलापूर महामार्गावर स्कूल बसला भीषण अपघात

धक्कादायक बाब म्हणजे घाबरलेल्या विद्यार्थ्याने त्याच्यासोबत घडलेला प्रकार आपल्या आई-वडिलांना देखील सांगितला नाही. या घटनेची माहिती कळताच त्याच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला. त्यांनी तात्काळ वारजे पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपी शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मंगेश साळवे या डान्स टीचरविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

पोलिसांकडून सध्या आरोपी शिक्षक मंगेश साळवेची चौकशी सुरू आहे. यापूर्वी सुद्धा या शिक्षकाने इतर विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अशाप्रकारचा गुन्हा केल्याप्रकरणी आरोपी शिक्षकाविरोधात पोलिसांकडून आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारजे पोलिस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply