द्राक्षांची गेल्या वर्षीपेक्षा २५ हजार टनाने निर्यात कमी

नाशिक : देशातून गेल्या वर्षी एक लाख सहा हजार ८०९ टन द्राक्षांची निर्यात झाली होती. यंदा आतापर्यंत ८१ हजार ६७७ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. अवकाळी पावसाच्या तडाख्यात द्राक्षांच्या झालेल्या नुकसानीप्रमाणे युक्रेन-रशिया युद्धामुळे वाहतुकीची बंद पडलेली व्यवस्था निर्यात कमी होण्यामागील असल्याचे मानले जात आहे.

द्राक्षांच्या यंदाच्या हंगामात आतापर्यंत महाराष्ट्रातून ८१ हजार ६६३ टन निर्यात झाली आहे. त्यात जवळपास ५४ हजारांहून अधिक टन निर्यात नेदरलँडमध्ये झाली आहे. कर्नाटकमधून १३ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. यंदा महाराष्ट्रातून निर्यात झालेल्या द्राक्षांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक द्राक्षे एकट्या द्राक्षपंढरी नाशिक जिल्ह्यातील आहेत. जिल्ह्यातून ७४ हजार टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. मध्यंतरी ‘अपेडा‘चे अध्यक्ष एम. अंगमुथू हे नाशिकच्या दौऱ्यावर आले असताना युक्रेन-रशिया युद्धामुळे समुद्रमार्ग बंद झाल्याने रशियात निर्यात होणाऱ्या द्राक्षांवर परिणाम झाल्याची व्यथा त्यांच्याकडे मांडण्यात आली होती. तसेच पर्यायी व्यवस्था काय करता येईल, हेही सुचविण्यात आले होते. प्रत्यक्षात त्यादृष्टीने केंद्र सरकारकडून उपाययोजना झालेल्या दिसत नाहीत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply