मुंबई : महावितरणचे ११ लाख मीटर सदोष? इलेक्‍ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचा आरोप

मुंबई : महावितरणकडून फेब्रुवारीत राज्यातील ७ लाख ८० हजार २१७ वीजग्राहकांना सरासरी बिल देण्यात आले आहे. फेब्रुवारीपर्यंत ११ लाख ३३ हजार ३९० सर्व प्रकारचे मीटर सदोष आढळले आहेत. मीटर उपलब्ध नसल्यामुळे ते बदलण्यात आलेले नाही. त्यामुळे महावितरण कंपनीचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला, असा आरोप महाराष्ट्र स्टेट इलेक्‍ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी फेडरेशनने केली आहे. महावितरण कंपनीकडून राज्यातील विविध घटकांतील वीजग्राहकांना पुरवठा करण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे महावितरणने काही महिने ग्राहकांना सरासरी वीज बिल दिले होते. त्यावरून ग्राहकांनी मोठा गोंधळ घातल्याने प्रशासनाची मोठी अडचण झाली होती. मात्र लॉकडाऊन नसतानाही प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यात राज्यातील ७ लाख ८० हजार २१७ वीज ग्राहकांना सरासरी वीज बिल दिले असल्याचा आरोप फेडरेशनने केला आहे. लॉकडाऊनमध्ये व्यवहार ठप्प असल्याने ग्राहकांना सरासरी वीज बिल देण्यात आले होते. मीटर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. याची प्रक्रिया सुरू असते. निविदा प्रक्रिया, मान्यता यासाठी वेळ जातो. मात्र फेब्रुवारीत ग्राहकांना सरासरी बिल देण्यात आलेले नाही, असे महावितरण प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.  


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply