Mumbai Accident : कार चालवाताना BMW चालकाला आली फिट, ३ वाहनांना जोरदार धडक; तिघे गंभीर जखमी

Mumbai Accident : मुंबईमध्ये रविवारी रात्री २ भीषण अपघाताच्या घटना घडल्या. आलिशान बीएमडब्ल्यू कारने ३ वाहनांना जोरदार धडक दिली. कार चालवाताना चालकाला फिट आल्यामुळे हा अपघात झाला. कारने एक दुचाकी आणि दोन रिक्षांना धडक दिली. या विचित्र अपघातामध्ये ३ जण जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे कुर्ल्यामध्ये डंपरने दुचाकी आणि रिक्षांना धडक दिली. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला. या दोन्ही अपघाताचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील लिंक रोडवरून बीएमडब्ल्यू कार चालवणाऱ्या चालकाला अचानक फिट आल्याने त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. या कारने दुचाकीसह दोन रिक्षांना जोरदार धडक दिली. या घटनेत तीन जण जखमी झाले असून जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

ही घटना रविवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास डीएन नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एसिक नगर बस स्टॉपवर घडली. घटनेची माहिती मिळताच डीएननगर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन जखमींना आणि फिट आलेल्या बीएमडब्ल्यू कार चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

Pune : बालेवाडीत दुचाकी घसरुन तरुणाचा मृत्यू

दुसरा अपघात कुर्ल्यामध्ये झाला. रविवारी रात्री कुर्ला परिसरात भरधाव वेगात आलेल्या डंपरने अनेक दुचाकींना धडक दिली आणि ऑटो रिक्षाला देखील धडक दिली. या अपघातामध्ये रिक्षा उलटली. अपघाताच्या वेळी चालक रिक्षामध्ये होता. रिक्षा उलट्यामुळे चालक रिक्षाखाली बराच वेळ अडकून होता. उपस्थित होता. या अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.

जवळपास ३० मिनिटांच्या अथक प्रयत्नांनंतर रिक्षाचालकाला डंपरखालून बाहेर काढण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या चालकाला तात्काळ सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असून उपचार सुरू आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत होता त्यामुळे हा भीषण अपघात झाला. या अपघातामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियमांचे पालन यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply