Cidco Lottery : सिडकोचा मोठा निर्णय! घरासाठी अर्ज करण्याच्या दोन अटी शिथिल

Cidco Lottery : सिडकोच्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी शेवटचे काही दिवस उरले आहेत. सिडकोच्या घरांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ११ डिसेंबर २०२४ होती. सिडकोच्या घरांसाठी आतापर्यंत जवळपास ९६ हजार अर्जदारांनी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान सिडकोने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सिडकोने अर्जप्रक्रिया अजून सोपी केली आहे.

आता सिडकोच्या घरांसाठी अर्ज भरताना बारकोड नसलेले रहिवासी प्रमाणपत्र आणि स्टॅम्प पेपरवर शपथपत्र देण्याची अट शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे आता तुम्हाला अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही. या अटी काढून टाकल्यामुळे आता उरलेल्या काही दिवसांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांना अर्ज करता येणार आहे, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे. वाटपपत्र देण्याआधी बारकोड असलेले प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असल्याचे सिडकोने सांगितले आहे.

सिडको २७ ठिकाणी ६७ हजार घरे बांधत आहे. त्यापैकी ४३ हजार घरांना महारेराकडून परवानगी मिळाली आहे. तर याचे बांधकामही सुर झाले आहे. यातील २६ हजार घरांसाठी अर्जप्रक्रिया ११ ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे.यातील घरे विविध गटांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. यातील ५० टक्के घरे ही तळोजा येथे आहे. तर इतर घरे खांदेश्वर, मानसरोवर या भागासिडकोच्या घरांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर होती.

मात्र, ही तारीख आता वाढवून ११ डिसेंबर करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. सिडकोने बारकोड असलेले प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द केली आहे. मात्र, तुम्हाला बारकोड असलेले रहिवासी प्रमाणपत्र वाचपावेळी सादर करायचे आहे, असं सांगितलं आहे. त्याचसोबत स्टॅम्प पेपरवर शपथपत्र सादर करण्याची अटदेखील शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे अर्जदार आता कोऱ्या कागदावरदेखील शपथपत्र सादर करु शकतात. (Cidco Terms Terminated)त आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply