पुण्यात कात्रजमध्ये 20 गॅस सिलेंडरचे स्फोट

पुणे: पुण्यातील कात्रज परिसरात गॅस सिलेंडरचे स्फोट झाला असल्याची माहिती समोर येत आहे. कात्रज परिसरातील गंधर्व लॉन्स जवळ सिलेंडरचे स्फोट झाले आहेत. या स्फोटांमुळे परिसरात आगीचे लोट पाहायला मिळत आहेत. या सिलेंडरचे स्फोट होत असतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटानास्थळी दाखल झाले. आत्तापर्यंत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, 20 सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या घटनेमुळे एक इसम किरकोळ जखमी आहे. मात्र, जिवितहानी झाल्याचे अद्याप वृत्त नाहीये. या स्फोटांच्या भयंकर आवाजांमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

एका शेडमधे असलेल्या तब्बल 20 सिलेंडरचा स्फोट झाला आहे. वृत्तानुसार, म्हटले जात आहे की, ज्या ठिकाणी हे सिलेंडरचे स्फोट झाले, त्या ठिकाणी बेकायदा गॅस रिफिलिंग सुरू होत. याच दरम्यान गॅस लिकेज होऊन हे स्फोट झाले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply