पंतप्रधान मोदी यांचा कॉलम:‎‎‎‎‎‎‎‎‎‎विश्वनाथ ते रामेश्वरमपर्यंत एक उत्सव‎, ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ आणि ‘विविधतेत एकता’ यांचे पर्व आहे काशी-तामिळ संगमम‎


काही दिवसांपूर्वीच मला सोमनाथच्या पवित्र भूमीवर‎सोमनाथ स्वाभिमान पर्वात सहभागी होण्याची सुसंधी‎मिळाली. या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी देशाच्या‎कानाकोपऱ्यातून लोक सोमनाथला पोहोचले होते. या‎कार्यक्रमादरम्यान माझी काही अशा लोकांशीही भेट‎झाली, जे यापूर्वी सौराष्ट्र-तामिळ संगममच्या वेळी‎सोमनाथला आले होते आणि त्याही आधी काशी-तामिळ‎संगममच्या वेळी काशीलाही गेले होते. अशा‎व्यासपीठांबाबतचा त्यांचा सकारात्मक विचार पाहून मी‎खूप प्रभावित झालो. म्हणूनच मी ठरवले की, या‎विषयावर मी माझे काही विचार मांडावेत.‎ ‘मन की बात’च्या एका भागामध्ये मी म्हटले होते की,‎माझ्या आयुष्यात मला तामिळ भाषा शिकता आली नाही‎याचे मला खूप दुःख आहे. हे आपले सौभाग्य आहे की‎गेल्या काही वर्षांपासून आपले सरकार तामिळ संस्कृती‎देशात अधिक लोकप्रिय करण्यासाठी निरंतर प्रयत्नशील‎आहे. हे ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या भावनेला अधिक‎सशक्त करणारे आहे. आपल्या संस्कृतीमध्ये ‘संगम’‎संकल्पनेला खूप महत्त्व आहे. या दृष्टीनेही काशी-तामिळ‎संगमम हा एक आगळावेगळा प्रयत्न आहे. यामध्ये‎भारताच्या विविध परंपरांमधील अद्भूत ताळमेळ तर‎दिसतोच, पण आपण एकमेकांच्या परंपरांचा सन्मान‎कसा करतो, हे देखील समजते. काशी-तमिळ संगममच्या‎आयोजनासाठी काशी हे सर्वात योग्य ठिकाण म्हणता‎येईल. काशीचा तामिळ समाज आणि संस्कृतीशी अत्यंत‎जवळचा संबंध राहिला आहे. काशी हे बाबा विश्वनाथांचे‎शहर आहे तर तामिळनाडूमध्ये रामेश्वरम तीर्थ आहे. ‎‎तामिळनाडूतील ‘तेनकासी’ला दक्षिण काशी असे म्हटले ‎‎जाते. तामिळनाडूचे महान सुपुत्र महाकवी सुब्रमण्यम‎भारती यांनाही काशीमध्ये बौद्धिक विकास आणि ‎‎आध्यात्मिक जागृतीची अद्भुत संधी मिळाली. येथेच‎त्यांचा राष्ट्रवाद अधिक प्रबळ झाला आणि त्यांच्या‎कवितांना नवी धार मिळाली. अशी अनेक उदाहरणे‎आहेत. वर्ष २०२२ मध्ये वाराणसीच्या भूमीवर‎काशी-तामिळ संगममची सुरुवात झाली होती. त्याच्या ‎‎उद्घाटन समारंभात सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले ‎‎होते. तेव्हा तामिळनाडूहून आलेल्या लेखक, विद्यार्थी, ‎‎कलाकार, विद्वान, शेतकरी आणि पाहुण्यांनी‎काशीसोबतच प्रयागराज आणि अयोध्येचे दर्शनही घेतले ‎‎होते. संगमममध्ये नवीन विषय जोडले जावेत. नवीन – ‎‎कल्पक पद्धतींचा अवलंब केला जावा आणि लोकांचा ‎‎सहभाग जास्तीत जास्त असावा हा यामागचा उद्देश होता.‎हा उपक्रम आपल्या मूळ भावनेशी जोडलेला राहूनही‎निरंतर पुढे जात राहावा असा प्रयत्न होता. वर्ष २०२३ च्या ‎‎दुसऱ्या आयोजनात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर ‎‎करण्यात आला, जेणेकरून भाषा हा त्यामध्ये अडथळा‎ठरू नये. याच्या तिसऱ्या आवृत्तीत भारतीय ज्ञान‎प्रणालीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. याचबरोबर‎शैक्षणिक संवाद, सांस्कृतिक सादरीकरण, प्रदर्शने आणि‎चर्चासत्रांमध्ये लोकांचा मोठा सहभाग पाहायला‎मिळाला. काशी-तामिळ संगममची चौथी आवृत्ती २‎डिसेंबर २०२५ रोजी सुरू झाली. या वेळची संकल्पना‎अत्यंत रंजक होती. मला ‘तामिळ करकलम’ म्हणजेच‎‘तामिळ शिका’. यात काशी आणि इतर ठिकाणच्या‎लोकांना तामिळ शिकण्याची एक अपूर्व संधी मिळाली.‎तामिळनाडूहून आलेल्या शिक्षकांनी काशीच्या‎विद्यार्थ्यांसाठी हा अनुभव अविस्मरणीय बनवला! प्राचीन‎तामिळ साहित्य ग्रंथ ‘तोलकाप्पियम’चा चार भारतीय‎आणि सहा परदेशी भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎या अभियानात सांस्कृतिक एकतेचा संदेश पसरवणारे‎पांड्य वंशाचे महान राजा ‘आदि वीर पराक्रम पांडियन’‎यांना श्रद्धांजली अर्पण केली. संपूर्ण आयोजनादरम्यान‎नमो घाटावर प्रदर्शने भरवण्यात आली. बनारस हिंदू‎विद्यापीठामध्ये शैक्षणिक सत्र, विविध सांस्कृतिक‎कार्यक्रमही पार पडले. काशी-तामिळ संगमममध्ये या‎वेळी ज्या गोष्टीने मला सर्वाधिक आनंद दिला.‎त्यांच्यासाठी हे एक असे अद्भुत व्यासपीठ आहे, यातून‎ते आपली प्रतिभा दाखवू शकतात. संगममव्यतिरिक्त‎काशीची यात्राही संस्मरणीय ठरावी, यासाठी विशेष‎प्रयत्न करण्यात आले. भारतीय रेल्वेने लोकांना‎तामिळनाडूहून उत्तर प्रदेशात नेण्यासाठी विशेष गाड्या‎चालवल्या. या प्रवासादरम्यान अनेक रेल्वेस्थानकांवर,‎विशेषतः तामिळनाडूमध्ये त्यांचा उत्साह वाढवण्यात‎आला. सुंदर गाणी आणि आपापसांतील चर्चेमुळे हा‎प्रवास अधिक आनंददायी झाला. येथे मी काशी आणि‎उत्तर प्रदेशातील माझ्या बंधू आणि भगिनींचे कौतुक करू‎इच्छितो, ज्यांनी काशी-तामिळ संगमम विशेष बनवण्यात‎मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी आपल्या पाहुण्यांच्या‎स्वागत आणि आदरातिथ्यात कोणतीही कसर सोडली‎नाही. अनेक लोकांनी तामिळनाडूहून आलेल्या‎पाहुण्यांसाठी आपल्या घरांचे दरवाजे उघडे ठेवले.‎पाहुण्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून स्थानिक‎प्रशासनही चोवीस तास कार्यरत होते. वाराणसीचा‎खासदार म्हणून माझ्यासाठी ही अभिमानाची आणि‎समाधानाची गोष्ट आहे. या वेळी काशी-तामिळ‎संगममचा समारोप समारंभ रामेश्वरममध्ये झाला. त्यात‎तामिळनाडूचे सुपुत्र आणि उपराष्ट्रपती सी.पी.‎राधाकृष्णनदेखील उपस्थित होते. त्यांनी आपल्या‎विचारांनी कार्यक्रमाची समृद्धी वाढवली. भारताच्या‎आध्यात्मिक समृद्धीवर भर देताना त्यांनी सांगितले की,‎कशा प्रकारे अशी व्यासपीठे राष्ट्रीय एकात्मता अधिक‎बळकट करतात. शैक्षणिक चर्चा . जनसंवादालाही मोठा‎वावा मिळाला.आपल्या संस्कृतींमधील संबंध अधिक‎दृढ झाले आहेत. वर्षाचा हा काळ प्रत्येक‎देशवासीयासाठी अत्यंत पावन मानला जातो. लोक‎मोठ्या उत्साहाने मकरसंक्रांती, उत्तरायण, पोंगल, माघ‎बिहू यांसारखे अनेक सण साजरे करत आहेत. हे सर्व‎उत्सव मुख्यत्वे सूर्यदेव, निसर्ग आणि शेतीला समर्पित‎आहेत. हे सण लोकांना एकमेकांशी जोडतात, ज्यामुळे‎समाजात सद्भाव आणि एकजुटीची भावना अधिक‎प्रबळ होते. या निमित्ताने मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो.‎ काशी-तामिळ संगममचा खोलवर प्रभाव‎पाहायला मिळाला आहे.याद्वारे सांस्कृतिक‎चेतनेला बळकटी मिळालीच, पण‎शैक्षणिक चर्चा, जनसंवादालाही चालना‎मिळाली. यामुळे आपल्या संस्कृतींमधील‎संबंध अधिक दृढ झाले आहेत.‎


Continue Reading

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:तन्मयतेने केलेल्या कामाचा ‎सुगंध वर्तनातून झळकतो ‎


तुम्ही जे काही कराल ते समर्पणातून करावे.पूजा, प्रार्थना करत असाल‎तर ते समर्पणातून करा. भले मग अल्प काळ का असेना. त्यात‎तन्मयता ठेवावी. त्या क्षणी भूतकाळात काय घडले ,पुढे काय होईल हे‎विसरून जा. २४ तास आपल्या धार्मिक कर्तव्यात पूर्णपणे गुंतलेल्या‎ लोकांना दिवसभरातील त्यांचे इतर वर्तन आकर्षक वाटेल. त्या छोट्या‎समर्पणाचा सुगंध दिवसभरातील आपल्या सर्व वर्तनातून दिसून येईल.‎तुम्ही तुमच्या कुटुंबात असाल किंवा व्यवसायात. तुमचे वर्तन‎आकर्षक होईल. लोकांना तुमच्याभोवती साधेपणा, स्पष्टवक्तेपणा,‎सत्यता आणि गोडवा जाणवेल. कारण तुमच्या दिनचर्येत तुम्हाला चार‎प्रकारचे लोक भेटतील : एक म्हणजे जवळचे लोक, दुसरे सामान्य‎ ओळख असलेले, तिसरे व्यर्थ लोक आणि प्रभावशाली लोक. या‎चारही प्रकारच्या लोकांशी समानतेने वागा. हा एक प्रकारचा योग आहे.‎मेडिटेशन- कारण भक्त प्रत्येकामध्ये देव पाहतो.‎


Continue Reading

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:तन्मयतेने केलेल्या कामाचा ‎सुगंध वर्तनातून झळकतो ‎


This post was originally published on this site.


Continue Reading

नवनीत गुर्जर यांचा कॉलम:नवीन वर्षात नवीन‎ प्रतिज्ञा, नवीन नियम


‎‎‎‎‎‎‎‎‎‎२०२५ मावळले ! २६ आले आहे. आपली प्रार्थना एवढीच‎की आपल्या सर्व कृती सत्कर्म ठराव्यात! देव आपल्याला‎आशीर्वाद देवो की गेल्या वर्षीसारख्या दुर्घटनांना तोंड द्यावे‎लागू नये. परंतु वेळ कधीही कुणासाठी थांबत नाही किंवा‎ती कुणासाठीही चालत नाही. वेळेचा स्वतःचा मार्ग आहे.‎वर्षानुवर्षे, युगानुयुगांपासून. वेळ कधीही थकलेली नाही‎किंवा ती कधीही बसली नाही. परंतु २०२५ नावाच्या‎भागाला अपघात आणि दुर्घटनांच्या अनेक खोल आणि ‎‎ताज्या जखमा आहेत. त्यावरून काळही जणू आता स्वतः ‎‎वृद्ध झाला आहे. त्याचेही केस जणू पिकले आहेत.‎ महाकुंभमेळा असो आणि त्यादरम्यान झालेले विविध ‎‎अपघात असोत किंवा अहमदाबाद विमान अपघात असो. ‎‎आजही त्या आठवणीने हाडेही थरथरतात. शरीरातील‎प्रत्येक नस थरथर कापते. महाकुंभाबद्दल बोलायचे झाले‎तर २९ जानेवारी २०२५ च्या त्या रात्री प्रयागराजमध्ये गर्दी‎इतकी प्रचंड होती की गंगेचे पाणीही कमी वाटत होते.‎पहिली डुबकी मारण्याच्या घाईत चेंगराचेंगरी झाली. मुले, ‎‎महिला, वृद्ध असे सगळेच चिरडले गेले. ओळख‎पटलेल्यांची संख्या ३७ होती. परंतु अनेक महिन्यांपासून‎आपल्या जिवलगांचा शोध घेणाऱ्या नातेवाईकांची संख्या‎मोठी होती. कारण त्यांचा पत्ता लागला नाही. त्यांचे काय‎झाले कुणास ठाऊक? ते वाळूत गाडले गेले होते का? ते‎गंगेत बुडाले का? कुणालाही माहिती नाही. ना लोकांना,‎ना प्रशासनाला, ना स्थानिक संस्थांना! …आणि सरकारचे‎म्हणाल तर त्याला तर काहीही ठाऊक नाही. कदाचित ते‎जाणून घेऊ इच्छितही नाही. दिल्ली रेल्वे स्टेशनवरही‎अशीच एक घटना घडली. तारीख १५ फेब्रुवारी होती. गर्दी‎व्यवस्थापनातील निष्काळजीपणामुळे कुंभ यात्रेकरूंमध्ये‎चेंगराचेंगरी झाली. १८ जणांचा मृत्यू झाला.‎ दुसरी मोठी घटना म्हणजे अहमदाबादहून लंडनला‎जाणारे एअर इंडियाचे ड्रीमलायनर विमान उड्डाणानंतर‎लगेचच कोसळले. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय‎रूपानी यांच्यासह सुमारे २६० जणांना काळाने गडप केले.‎चौकशी सुरू असली तरी खरे कारण अद्याप अज्ञात आहे.‎भारतात क्रिकेटचा ज्वर कुणाला ठाऊक नसेल?‎आयपीएल सुरू झाल्यापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने‎पहिल्यांदाच विजय मिळवला होता. ४ जून २०२५ रोजी या‎विजयाच्या उत्सवादरम्यान इतके लोक जमले की त्यांनी‎एकमेकांना चिरडले. तिथे सुमारे ११ जणांचा मृत्यू झाला.‎या घटनेने जाहीर कार्यक्रमांच्या सुरक्षिततेबद्दल गंभीर प्रश्न‎उपस्थित केले. पण कोण ऐकते? प्रशासन गप्प आहे‎आणि सरकारांनी तर आपले कान केव्हाच बंद केलेले‎आहेत. उत्तराखंडमध्ये ढगफुटीला मर्यादाच नाही.‎माणसाने डोंगर पोखरले , नद्या अरुंद केल्या. मार्गात घरे‎बांधली. नंतर त्याचे दुष्परिणामही भोगले आहेत. काही‎ठिकाणी ढगफुटीने वस्त्या वाहून नेल्या तर काही ठिकाणी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎घरे – लोक बुडाले. ५ ऑगस्ट रोजी चमोली -‎पिथोरागडमध्ये पूर, भूस्खलनात २५ मृत्यू झाले.‎अनियोजित विकासाचे धोके पुराच्या पाण्यासारखे‎उदयास आले. परंतु कोणतीही खबरदारी किंवा दक्षता‎पाळली नाही. सरकारे स्वतःचा बचाव करण्यासाठी‎सबबी सांगत राहिली. नेते मनात येईल ते बोलत राहिले.‎ढगफुटी, भूस्खलन सुरूच राहिले. लोकांचे मृत्यू होत‎राहिले. १ एप्रिल २०२५ रोजी गुजरातमधील डिसा येथील‎एका फटाका कारखान्यात स्फोटात २१ कामगारांचा मृत्यू‎झाला. या अपघातानंतर औद्योगिक सुरक्षा व कामगार‎कायदे कडक करण्याची मागणी झाली. शेवटी‎सारवासारवी झाली. आपण फक्त आशा करू शकतो की‎आपल्या चुकांमुळे नव्या वर्षात कोणतेही अपघात होणार‎नाहीत याची शपथ घेऊ.सरकारे अशा दुर्घटनांची‎पुनरावृत्ती होऊ नये म्हणून प्रामाणिक प्रयत्न करतील.‎ अनियोजित विकासाचे धोके पुराच्या‎पाण्यासारखे समोर आले परंतु कोणतीही‎खबरदारी घेतली गेली नाही. सरकारे‎सबबी सांगतात. नेते त्यांच्या मनात येईल‎ते बोलतात. आपल्या चुकांमुळे नवीन‎वर्षात कोणतीही दुर्घटना घडणार नाही,‎अशी आशा बाळगायला हरकत नाही.‎‎


Continue Reading

लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन यांचा कॉलम:इराणमधील राजवटीवर ‎संकटाचे ढग आहेत का?‎


This post was originally published on this site.


Continue Reading

लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन यांचा कॉलम:इराणमधील राजवटीवर ‎संकटाचे ढग आहेत का?‎


‎‎‎‎‎‎‎‎‎‎इराणमधील अशांततेमुळे पुन्हा एकदा इस्लामिक‎रिपब्लिकच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले‎आहे. मागील घटनांप्रमाणेच निदर्शनांचे चित्र समोर येत‎आहेत. सोशल मीडिया वातावरण आणखी तापवत‎आहे. इराणबाहेर सत्ता परिवर्तन होईल अशी अटकळ‎पसरत आहे. १९७९ च्या इस्लामिक क्रांतीपासून इराणने‎राजकीय सुधारणा चळवळी, आर्थिक चिंता,‎सामाजिक निर्बंध किंवा इतर तात्कालीक कारणांमुळे ‎‎अनेक काळ अंतर्गत अशांततेचा अनुभव घेतला आहे. ‎‎सर्व प्रकारची आंदोलने होऊनही तीच व्यवस्था कायम ‎‎आहे. याचे कारण असे की इस्लामिक क्रांतीने केवळ ‎‎शाहला काढून टाकले नाही आणि नवीन सरकार‎स्थापन केले नाही तर एक विशिष्ट व्यवस्था निर्माण‎केली. त्यात विचारसरणी, धर्मगुरूंचे अधिकार आणि ‎‎सुरक्षा यंत्रणा एकमेकांशी जोडलेली आहेत.‎ या व्यवस्थेच्या केंद्रस्थानी इस्लामिक रिव्होल्यूशनरी‎गार्ड कॉर्प्स आहे. ते केवळ सीमांचे रक्षण करणारे‎पारंपारिक सैन्य नाही तर क्रांतीचे रक्षक आहे. एक‎संस्था म्हणून त्याचे अस्तित्व इस्लामिक रिपब्लिकपासून‎वेगळे करता येत नाही. अरब स्प्रिंग दरम्यान इजिप्त‎आणि तुर्कीमधील सैन्याने सत्ताधारी वर्गाचे नव्हे तर‎राज्याचे रक्षण केले. परंतु इराणमध्ये सुरक्षा यंत्रणा स्वतः‎राजकीय व्यवस्थेचा भाग आहे. म्हणून अशांततेच्या‎काळात ते तटस्थ किंवा अलिप्त राहू शकत नाही. परंतु‎याचा अर्थ असा नाही की इराणी सरकार दबावाशिवाय‎आहे. पिढ्यानपिढ्या होणाऱ्या बदलांमुळे गंभीर आव्हाने‎निर्माण झाली आहेत. आज निदर्शनांचे नेतृत्व करणाऱ्या‎तरुण आणि शहरी मध्यमवर्गाला १९७९ च्या क्रांतीशी‎भावनिक जोड नाही. त्यांची विचारसरणी क्रांतीच्या‎आठवणींपेक्षा डिजिटल कनेक्टिव्हिटी, जागतिक‎अनुभव आणि वाढत्या अपेक्षांमुळे अधिक प्रेरित आहे.‎इराणला दीर्घकाळ लागू असलेल्या निर्बंधांचा मोठा‎फटका बसला आहे. आर्थिक एकाकीपणामुळे विकास‎खुंटला आहे. आधुनिकीकरण मर्यादित झाले. संधी कमी‎झाल्या आहेत. याचा फटका सामान्य लोकांना सहन‎करावा लागला आहे. त्यामुळे निदर्शने वाढली आहेत.‎विशेषतः देशाचे उज्ज्वल भविष्य न पाहणाऱ्या‎तरुणांमध्ये. अमेरिका आणि इस्रायलशी शत्रुत्व देखील‎सामाजिक ओझे म्हणून पाहिले जात आहे. इराणमध्ये‎२००९, २०१७-१८, २०१९ आणि २०२२ मधील‎अशांततेसह अनेक मोठ्या निदर्शने झाली . प्रत्येक वेळी‎बाहेरील लोकांनी राजवटीच्या पतनाबद्दल अंदाज‎लावला. प्रत्येक वेळी तीच व्यवस्था कायम राहिली.‎निदर्शनांचे नेतृत्व करण्यास सक्षम एकसंध राष्ट्रीय नेतृत्व‎नाही. विरोधी नेते अनेकदा सरकारबाहेर राहिले आहेत.‎इराणी समाजात विश्वासार्हतेचा अभाव आहे. परिणामी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎निदर्शने अचानक सुरू होऊ शकतात. परंतु त्यांना जोर‎मिळत नाही. इराणच्या सुरक्षेत कोणतेही तडे नाहीत.‎आयआरजीसी, पोलिस आणि गुप्तचर संस्था एकजूट,‎निष्ठावान, प्रभावी आहेत. अलिकडच्या आठवड्यात‎पाश्चात्य आवाज अधिक वाढले. व्हेनेझुएलासारख्या‎अमेरिकेच्या कृतींमुळे ते बळकट झाले आहेत. परंतु‎इराण व्हेनेझुएला नाही. हा खूप मोठा अधिक सुरक्षित ,‎गुंतागुंतीचा देश आहे. तेथील बाह्य लष्करी कारवाईमुळे‎पश्चिम आशियामध्ये तणाव वाढू शकतो. अनेकदा असे‎गृहीत धरले जाते की बाह्य शक्ती राजवट बदल घडवून‎आणू शकतात. परंतु हेतू आणि क्षमतांमध्ये मोठी दरी‎आहे. भूतकाळात परदेशातून प्रायोजित अशांततेमुळे‎इराणमध्ये “परदेशी कट’ असल्याच्या गृहितकाला‎बळकटी मिळाली. राष्ट्रवादाला खतपाणी मिळाले.‎शिवाय चीन- रशियालाही अस्थिर इराण नको.हे हे‎महत्त्वाचे ठरते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे)‎ इराणमध्ये निदर्शनांचे नेतृत्व करणाऱ्या‎तरुणांना १९७९ च्या क्रांतीशी भावनिक‎नाळ नाही. तरीही ही एक व्यवस्था आहे.‎त्यात विचारसरणी, धर्मगुरूंची शक्ती‎आणि सुरक्षा यंत्रणा एकमेकांशी जोडलेले‎आहेत.‎


Continue Reading

ज्यां द्रेज यांचा कॉलम:‎‎‎‎‎‎‎‎‎‎नावात दुरुस्तीसाठी सामान्य लोक किती काळ भटकंती करतील?‎


कंदनी कुमारी ही झारखंडच्या लातेहार जिल्ह्यात राहणारी‎१६ वर्षांची मुलगी आहे. तिचे नाव शाळेच्या रजिस्टर‎आणि प्रमाणपत्रात बरोबर लिहिलेले आहे. परंतु तिच्या‎आधार कार्डवर कुमारी कांतनी किरण असे लिहिले आहे.‎तिने चार वेळा आधार दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला.‎परंतु प्रत्येक वेळी तिचा अर्ज नाकारला गेला.‎ तुम्हाला अशा समस्यांना तोंड देणारी मुले किंवा प्रौढ‎माहित असतील. आधार कार्डवरील त्यांचे नाव किंवा‎इतर माहिती शाळेचे प्रमाणपत्र, बँक खाते किंवा मतदार‎ओळखपत्रावरील माहितीशी जुळत नाही. कमी शिक्षित‎आणि गरीब लोकांसाठी या चुका दुरुस्त करणे कठीण,‎महाग, वेळखाऊ आहे.‎ आधार डेटाबेसमधील लोकसंख्याशास्त्रीय तपशील‎अविश्वसनीय असणे हे या विसंगतींचे कारण आहे . नावे‎अनेकदा घाईघाईने समाविष्ट केली जातात. योग्य‎स्पेलिंगकडे दुर्लक्ष करून. जन्मतारीख जागेवरच तयार‎केल्या जातात. याव्यतिरिक्त अनेक लोकांची अनेक नावे‎किंवा एकाच नावाचे अनेक स्पेलिंग असतात. सरिता‎उरांव नावाच्या आदिवासी महिलेला सरिता देवी किंवा‎सरिता ओराइन असेही म्हटले जाऊ शकते.‎ सुरुवातीच्या काळात आधार क्रमांक मोठ्या प्रमाणात‎जारी केले जात होते. तेव्हा यूआयडीएआयला‎लोकसंख्याशास्त्रीय तपशीलांची फारशी काळजी नव्हते.‎हे तपशील शेअर केले जाऊ नयेत. आधारचा प्राथमिक‎उद्देश बायोमेट्रिक पडताळणी होता. याचा अर्थ एखाद्या‎व्यक्तीचा आधार क्रमांक बायोमेट्रिक रीडरमध्ये प्रविष्ट‎करणे. त्यांचे बोट किंवा डोळा स्कॅन करणे आणि तो नंबर‎त्या व्यक्तीचा आहे याची पडताळणी करणे. यासाठी‎नाव, जन्मतारीख किंवा पत्ता यासारख्या तपशीलांची‎आवश्यकता नव्हती.‎ पण नंतर आधार केवळ बायोमेट्रिक पडताळणीसाठीच‎नव्हे तर ई-केवायसीसाठी देखील वापरले जाऊ लागले.‎तुमचे बँक खाते असेल, तर तुम्हाला ई-केवायसीची‎माहिती असेल. तुमचे बायोमेट्रिक पडताळणी बँकेत केले‎जाते. तेव्हा बँक आधार डेटाबेसमधून तुमचे नाव आणि‎इतर तपशील मिळवते आणि नंतर त्यांच्या रेकॉर्डमधील‎तपशीलांशी त्यांची तुलना करते. तपशील जुळले तर‎तुमचे ई-केवायसी यशस्वी होते. तसे झाले नाही तर बँक‎तुमचे खाते विसंगती दूर होईपर्यंत गोठवू शकते.‎ बऱ्याच लोकांना या विसंगती दुरुस्त करणे कठीण जाते.‎तुमच्या आधार आणि बँक खात्यावरील नाव वेगळे‎असेल तर ते कसे दुरुस्त करता येईल? एक मार्ग म्हणजे‎बँक खात्यावरील स्पेलिंग दुरुस्त करणे.‎ हे गुंतागुंतीचे असू शकते आणि बँक व्यवस्थापक तसे‎करण्यास कचरतात. त्याऐवजी ते ग्राहकांना त्यांचे आधार‎दुरुस्त करण्यास सांगतात. परंतु हे देखील कठीण असू‎शकते.‎ गेल्या काही वर्षांत ई-केवायसीमुळे बँकिंग व्यवस्थेत‎लक्षणीय समस्या निर्माण झाल्या आहेत. आधार आणि‎बँक रेकॉर्डमधील तफावतीमुळे लाखो लोकांची खाती‎लॉक झाली आहेत. इतर प्रकरणांमध्येही अशाच समस्या‎येत आहेत. उदाहरणार्थ- शाळेच्या रेकॉर्डमधील नावाचे‎स्पेलिंग आधारशी जुळत नाही तोपर्यंत मुलांचे “अपार’‎आयडी तयार करता येत नाहीत. आणि बऱ्याचदा‎कंदनीसोबत घडल्याप्रमाणे विसंगती असतात. बँकेने तिचे‎खाते उघडण्यासाठी आधारचा वापर केला. तिने तिच्या‎शाळेच्या प्रमाणपत्राशी जुळण्यासाठी आधार दुरुस्त केला‎तर नवीन विसंगती उद्भवतील.‎ आधारमधील लोकसंख्याशास्त्रीय डेटाबेसवर विश्वास‎नसल्यामुळे हे घडले आहे. यूआयडीएआय हा या‎डेटाबेसचा निर्माता आणि संरक्षक असल्याने त्याला‎जबाबदार धरले पाहिजे. दुर्दैवाने यूआयडीएआयच्या‎संसदीय देखरेखीची तरतूद आधार कायद्यातून काढून‎टाकण्यात आली होती.‎
(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे)‎


Continue Reading

एन. रघुरामन यांचा कॉलम:आपण बाहेरील जगदेखील वर्गामध्ये आणू शकतो


गेल्या वीस वर्षांपासून तो चौचिल्लामध्ये एकाच ठिकाणी राहत होता. त्या छोट्याशा जागेबाहेर त्याने तासाभरासाठीही पाऊल ठेवले नाही. तो बाहेर जाऊही शकत नाही. कारण त्याला कुणी तिथून बाहेर पडू देणार नाही. परंतु, गेल्या दोन आठवड्यांपासून तो थायलंडपासून ऑस्ट्रेलियापर्यंत प्रवास करत आहे. मुलाखती देत आहे आणि अनेक वेळा नाकारले गेल्यावर त्याला एक शानदार नोकरीचा प्रस्तावही मिळाला आहे. जेव्हा त्याला पहिल्यांदा नाकारले गेले तेव्हा त्याने आपल्या चुका पाहिल्या, त्या सुधारल्या आणि पुढच्या मुलाखतीत पुन्हा काही नवीन चुका केल्या, पण अखेर त्याला नोकरी मिळालीच. मात्र, तो नियुक्तिपत्र स्वीकारू शकत नाही. का माहीत आहे? कारण तो आजही त्याच जागेत आहे, जिथे गेल्या दोन दशकांपासून राहत आहे. ‘काय मूर्खपणा आहे हा’ – असे तुम्हाला वाटू शकते. बाहेर न जाता आणि प्रत्यक्ष मुलाखत न देता त्याला नोकरीचा प्रस्ताव कसा काय मिळाला, असा विचार तुम्ही करत असाल. मी तुमची थट्टा करत आहे असे तुम्हाला वाटतेय का? मुळीच नाही. तुम्ही वर जे काही वाचले ते सर्व सत्य आहे. कॅलिफोर्नियाच्या सेंट्रल व्हॅलीमधील चौचिल्ला शहरात असलेल्या ‘व्हॅली स्टेट प्रिझन’मध्ये तुमचे स्वागत आहे. वर ज्याच्याबद्दल सांगितले तो एकटाच नाही, तर येथील अनेक कैद्यांना अशा प्रकारचे हेडसेट (व्हीआर हेडसेट) घालण्यात आले आहेत, जे अपारदर्शक चष्म्यासारखे दिसतात. हाय डेफिनिशन व्हिडिओ सुरू होताच त्यांची मान हळूच वळली आणि चेहऱ्यावर हसू आले. त्यांचा प्रवास सुरू झाला होता. कोणी जगातील इतर भाग पाहत आहे, तर कोणी ते ठिकाण पाहत आहे जिथून तो आला होता आणि गेल्या वीस वर्षांत त्यात कसे बदल झाले आहेत. तर काहींनी नोकरीच्या मुलाखतीसारखे व्यावहारिक अनुभव घेतले. कैदी आभासी डेस्कवर आभासी मुलाखतकारांसमोर बसले. मुलाखतकारांची वृत्ती कधी सहज तर कधी कडक असते आणि ते कैद्यांना सुटका झाल्यानंतर रोजगार शोधण्याचे कौशल्य शिकवतात. त्यांच्यासाठी बाहेरील जग पूर्णपणे बदलले आहे – अर्ज करण्यापासून ते मुलाखतीपर्यंत सर्वच. एखाद्यासमोर बसून त्याला ‘मी या नोकरीसाठी योग्य का आहे’, हे पटवून देणे त्यांच्यासाठी खूप कठीण होते. हेडसेट काढल्यानंतर स्वयंसेवक कैद्यांना त्या भावना आणि मानसिक धक्क्यातून सावरण्यास मदत करतात, जे या अनुभवादरम्यान समोर आले होते. हे कैदी लवकर मुक्त होणार नाहीत. काही कैदी २०३० मध्ये, तर काही कदाचित २०४० नंतर सुटतील. पण तेव्हा त्यांना ही खंत नसेल की ‘तंत्रज्ञानात आपण मागे पडलो.’ अनेक दशकांपासून तुरुंगात असलेल्या काही लोकांना तर एटीएम कसे चालते हेसुद्धा माहीत नाही. जगात किती नवीन गोष्टी आल्या आहेत आणि यंत्रांच्या वापरामुळे जगाला किती सोयी मिळाल्या आहेत याची त्यांना कल्पना नाही.हा असा कार्यक्रम आहे, जो बाहेरील जग आत आणतो. कैद्यांचे पुनर्वसन आणि विशेषतः आता बदललेल्या समाजाशी त्यांना पुन्हा जोडण्यासाठी असे तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावते. ज्यांनी दीर्घकाळापासून वास्तविक जग पाहिले नाही, त्यांना साधी सिटी बस कशी पकडायची किंवा मेट्रो सेवा कशी वापरायची हे माहीत नाही. कारण त्यांच्या अनुपस्थितीत या गोष्टी सुरू झाल्या आहेत. या तंत्रज्ञानामुळे त्यांना मानसिक फायदा मिळतो आणि तणाव कमी होतो. जर ‘व्हीआर हेडसेट’ कैद्यांना तुरुंगाबाहेरचे आयुष्य दाखवू शकतात, त्यांचा मानसिक धक्का कमी करू शकतात, भावना संतुलित करू शकतात आणि खऱ्या जगात सुरक्षित पुनरागमनासाठी सज्ज करू शकतात, तर आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला बोस्टनला नेऊन हार्वर्डच्या विद्यार्थ्यांसोबत का शिकवता येणार नाही – मग ते आभासी पद्धतीने का असेना. यामुळे अनोळखी जगात त्यांचा प्रवेश सोपा होईल. मुले आभासी मुलाखती देऊ शकतात आणि विद्यापीठाच्या समुपदेशकाच्या मदतीने चुका सुधारू शकतात, जेणेकरून कठीण मुलाखतींमध्ये यश मिळवण्यासाठी स्वतःला तयार करू शकतील. ते आवडीचे शहर निवडू शकतात. तिथल्या स्थानिक बसपासून ते किराणा दुकानांपर्यंत आणि भाड्याच्या घरांपर्यंत सर्व काही जाणून घेऊ शकतात, जेणेकरून जेव्हा ते प्रत्यक्ष तिथे जातील, तेव्हा त्यांच्यासाठी सर्व काही सोपे असेल.


Continue Reading

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:वाद, सहकार्य आणि ‎एकांतामुळे एकटेपणा संपतो‎


This post was originally published on this site.


Continue Reading

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:वाद, सहकार्य आणि ‎एकांतामुळे एकटेपणा संपतो‎


This post was originally published on this site.


Continue Reading