समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी राज ठाकरे यांच्यावर चौफेर टीका केली. राज ठाकरे यांच्यात अयोध्येला जाण्याची हिम्मत नाही ते घाबरले आहेत. आता तब्येतीचे कारण देत आहेत. हे त्यांचे बहाणे असल्याचं अबू आझमी यांनी म्हटलं आहे. त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, माफ केलं तरच त्यांनी अयोध्येला जावं असं देखील अबू आझमी यांनी म्हटलं. ते रविवारी (२२ मे) पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
अबू आझमी म्हणाले, “बिचारे राज ठाकरे खूप अडचणीत आहेत. त्यांचं राजकारण संपलंय. त्यांना विचारणारे कोणी नाही. मी जेव्हा शपथ घ्यायला गेलो तेव्हा स्पीकर साहेबांना विचारलं होतं की शपथ कुठल्या भाषेत घेऊ. त्यांनी सांगितलं होतं भारतातील कुठल्याही भाषेत शपथ घेऊ शकता. मात्र, मनसेने मराठी, हिंदीवरून किती मोठा गोंधळ केला हे सर्वांनी पाहिलं आहे. उत्तर भारतीयांना त्यांनी मारहाण केली हे सर्व त्यांनी मराठी नागरिक त्यांना साथ देतील म्हणून केलं. परंतु, मराठी बांधवांनी त्यांना साथ दिली नाही.”
“अयोध्याला कसे जाणार त्यांच्यात हिंमत नाही. राज ठाकरे यांनी जे केलं आहे ते भरावं लागेल. ज्या उत्तर प्रदेशात राम भगवान, श्रीकृष्ण यांचा जन्म झाला त्याच उत्तर भारतीयांना सन्मान द्यायला हवा होता. राज ठाकरे यांचे बहाणे आहेत. त्यांच्यात हिंमत नाही, ते घाबरले आहेत. भाजपाचा खासदार म्हणतोय त्यांना येऊ देणार नाही, हे सर्व मिली जुली आहे. उत्तर भारतीयांची त्यांनी माफी मागावी, माफ केले तरच त्यांनी अयोध्येला जावं. सन्मानासाठी उत्तर भारतीय जीव देतील. राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उचलला आहे म्हणून त्यांना महाविकास आघाडी अटक करत नाही. त्यांना वाटतं तसं केल्यास मतदान जाईल,” असा आरोप अबू आझमी यांनी केला.
अबू आझमी पुढे म्हणाले, “बाबरी मस्जिद प्रकरणी आम्ही गुपचूप निकाल मान्य केला. आता ज्ञानव्यापी मस्जिद प्रकरण पुढे आणलं जात आहे. देशात हाच विषय आहे का? भारत नरसंहाराच्या दिशेने जात आहे. याबाबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितलं आहे, पण यावर कारवाई होत नाही. महाराष्ट्रात सर्वात मोठा हिंदुत्ववादी कोण आहे हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपाचा देखील तोच प्रयत्न आहे.”
“आम्ही बाबरी मस्जिद तोडली अशी चढाओढ त्यांच्यात लागली आहे. हे सगळं मतदानासाठी सुरू आहे. आमचा शिवसेनेला पाठिंबा आहे. उद्धव ठाकरे हे म्हणाले होते की ३० वर्ष झालं युतीत सडलो. आता तुम्ही त्यांची साथ सोडली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत आलात, आमच्यासोबत सेक्युलरकडे जाणार होतात तर एक विचारायचं आहे की, सगळ्यात मोठे हिंदुत्ववादी होऊन भाजपासोबत का लढत आहात? सेक्युलरिझमचा प्रचार का करत नाही?” असे प्रश्न आझमी यांनी उद्धव ठाकरे यांना विचारले.हे पण वाचा-
शहर
- अहिल्यानगर: लेकीला वाचवण्यासाठी बापाची बिबट्याशी झुंज; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद
- मुंबई: आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावणार ५,५०० विशेष बसेस; थेट गावातून मिळणार पंढरपूरची बस.
- पुणे: पोलिसावर जीवघेणा हल्ला; हेल्मेटने मारहाण करत ई-चलन मशीनची तोडफोड, कात्रजमधील धक्कादायक प्रकार!
- मुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप तिसऱ्या दिवशीही कायम; प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटीच्या १६० बसेस धावणार
महाराष्ट्र
- विक्रमी कामगिरी! वैभव सूर्यवंशीचा धमाका; अवघ्या ११ चेंडूत अर्धशतक ठोकत रचला विश्वविक्रम!
- पुणे: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून ५ कोटींची फसवणूक; हिंजवडीतील अहेरकर कुटुंब गजाआड
- अहिल्यानगर: लेकीला वाचवण्यासाठी बापाची बिबट्याशी झुंज; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद
- मुंबई: आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावणार ५,५०० विशेष बसेस; थेट गावातून मिळणार पंढरपूरची बस.
गुन्हा
- पुणे: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून ५ कोटींची फसवणूक; हिंजवडीतील अहेरकर कुटुंब गजाआड
- पुणे: पोलिसावर जीवघेणा हल्ला; हेल्मेटने मारहाण करत ई-चलन मशीनची तोडफोड, कात्रजमधील धक्कादायक प्रकार!
- पुण्यात कौटुंबिक वादातून भयानक टोकाचं पाऊल! आरवी परिसरात २५ वर्षीय विवाहितेची पतीने केली निर्घृण हत्या; नराधम पतीला बेड्या
- बीडमध्ये भरदिवसा थरार! ऊसतोड मजुरांच्या उचलीच्या वादातून मुकादमाचे अपहरण; स्विफ्ट कारमधून आलेल्या चौघांवर गुन्हा दाखल
राजकीय
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
- "मी मोठ्या धर्मसंकटात!" शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर खासदार ओमराजे निंबाळकरांनी अखेर सोडलं मौन
- मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांशी राष्ट्रवादी सैनिक सेल प्रदेशाध्यक्ष दिपकराजे शिर्के यांची विविध मागण्या संदर्भात भेट व चर्चा ;
इतर
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
- दैनिक राशिभविष्य १८ जून २०२६: गजकेसरी राजयोगामुळे या राशींचे नशीब फळफळणार, मिळणार धनलाभ!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

पुण्यातील पाटील इस्टेट परिसरात सराईत गुन्हेगाराने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.
ठाकरे गट आणि काँग्रेसच्या संभाव्य राजकीय समीकरणांबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांनी विधान केलं आहे.
पुणे-सातारा महामार्गावर टेम्पोची जोरदार धडक Pune Accident | पुणे-सातारा
देश विदेश
- हरियाणा: पोलीस ठाण्यात कर्करोगग्रस्त रुग्णाला बेदम मारहाण; दोषी ३ पोलीस कर्मचारी निलंबित
- देशातील महामार्ग आणि एक्सप्रेस वेवर आता हवामानानुसार बदलणार 'स्पीड लिमिट'; नियमांचे उल्लंघन केल्यास आपोआप ई-चलान!
- नवी मुंबई: विमानतळावर पाणीगळतीचा व्हिडीओ व्हायरल; विमानतळ प्रशासनाचे स्पष्टीकरण, 'प्रवाशांची दिशाभूल होतेय!'
- इराण-व्हेनेझुएलानंतर आता अमेरिकेच्या रडारवर 'हा' देश? राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका विधानाने जगात खळबळ, तणाव वाढणार!

























Subscribe to my channel


