
New Delhi : दिल्लीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्लीच्या राजेंद्रनगरमधील आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी भरल्याची घटना घडली. या भरलेल्या पाण्यात बुडून दोन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. तर एकाचा शोध सुरु आहे. या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची टीम घटनास्थळी मदतकार्याला पोहोचली.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या राजेंद्र नगर भागातील नाला फुटल्यानंतर जवळील असलेल्या कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी भरलं. कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी भरल्यानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे काही विद्यार्थी अडकले. या दुर्घटनेत पाण्यात अडकलेल्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर या पाण्यात आणखी काही विद्यार्थी अडकल्याची माहिती मिळत आहे. या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचं पथक घटनास्थळी पोहोचलं. या पथकाने तातडीने विद्यार्थ्यांचा शोध सुरु केला.
|
Pune Crime News : पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत; लोहगाव परिसरात दुकानासह वाहनांची तोडफोड |
राजेंद्र नगरमध्ये झालेल्या या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या दोन्ही मुली आहेत. अग्निशमन विभाग आणि एनडीआरएफच्या पथकाने दोन्ही मृतदेह बाहेर काढले आहेत. या सेंटरमध्ये आणखी एक व्यक्त अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफकडून अजूनही शोध मोहीम सुरु आहे.
राव कोंचिग सेंटरमध्ये पाणी भरल्यानंतर झालेल्या दुर्घटनेवर दिल्लीच्या शिक्षण मंत्री आतिशी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आतिशी म्हणाल्या की, 'अग्निशमन दल आणि एनडीआरएफचं पथक घटनास्थळी आहे. दिल्लीचे महापौर आणि स्थानिक आमदार घटनास्थळी उपस्थित आहेत. माझंही घटनास्थळावर लक्ष आहे. दुर्घटनेनंतर चौकशीचे आदेश दिले आहे. या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली जाईल. त्याला अजिबात माफ केलं जाणार नाही'.
घटनास्थळी उपस्थित विद्यार्थ्याने सांगितलं की, 'आज सायंकाळी ७ वाजताच्या आसपास ग्रंथालय बंद करण्यात येतं. त्यावेळी आम्ही एकूण ३५ विद्यार्थी होतो. आम्हाला तातडीने बाहेर निघण्यास सांगितलं. त्यामुळे विद्यार्थी तळघरातून बाहेर येत होते. याचवेळी तळघरात प्रचंड वेगाने पाणी आल्याने त्यात काही विद्यार्थी अडकले. अवघ्या दोन ते तीन मिनिटांत तळघर पाण्याने भरलं. पाणी इतकं खराब होतं की, काहीच दिसत नव्हतं'.
शहर
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- मुंबई: तुमची समाजाला गरज आहे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली रुग्णालयात जाऊन अण्णा हजारेंची भेट, तब्येतीची केली विचारपूस
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
महाराष्ट्र
- गडचिरोलीः आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे! १५ दिवसांत तीन माता आणि अर्भकांच्या मृत्यूने खळबळ, शासकीय रुग्णालयांच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह
- जालना: मनोज जरांगे पाटलांचा आंतरवाली सराटीतून एकनाथ शिंदे, उदय सामंत आणि शंभूराज देसाईंवर कडक शब्दांत हल्लाबोल, दिला थेट इशारा
- धाराशिव: मराठा आरक्षणावरून संतापाचा लाव्हा उसळला! उमरगा तहसील कार्यालयात घुसून आंदोलकांनी पेटवली तहसीलदारांची खुर्ची; चौघे जण ताब्यात
- कोल्हापुर: माजी सैनिक आणि शेतकऱ्यांचा एमआयडीसी कार्यालयावर धडक मोर्चा, शिरोळमध्ये गेट तोडले; थेट मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर हल्ल्याचा इशारा
गुन्हा
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा
- गोवा: देशातील ड्रग्ज नेटवर्कचा समूळ नायनाट करणार; गोव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा, तीन वर्षांचा रोडमॅप जाहीर
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल




























Subscribe to my channel



