‘हिम्मत असेल तर..’ किरीट सोमय्या दापोलीत पोहोचण्याआधीच अनिल परब संतापले

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परबांच्या अनधिकृत रिसॉर्टविरोधात मोहीम उघडल्याचं चित्र आहे.सोमय्या यांनी मागील आठवड्यातच ते दापोलीत रिसॉर्ट तोडायला जाणार असल्याची घोषणा केली.  

यासाठी त्यांनी प्रतिकात्मक हातोडा देखील बनवला. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत बांधण्यात आलेले रिसॉर्ट अनिल परब यांच्या मालकीचे आहेत. तसेच ते अनधिकृतपणे बांधण्यात आल्याचा आरोप सोय्यांनी केला होता. यानंतर सोमय्या थेट कोकणाच्या वाटेवर आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे कार्यकर्ते देखील सहभागी झाले आहेत.

दरम्यान, या प्रकरणावर आताअनिल परब यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. संबंधित रिसॉर्ट माझं नसल्याचं त्यांनी म्हटलंय. यासंबंधी ज्या चौकशा करायच्या होत्या त्या झालेल्या आहेत. मी कोर्टात याचिका देखील दाखल केली आहे, असं ते म्हणाले.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *