पुणे : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सरकारी वकील प्रवीण चव्हाण, सहाय्यक पोलिस आयुक्त सुषमा चव्हाण यांच्यातील संभाषण उघड करणाऱ्या पेनड्रॉईव्ह प्रकरणामध्ये चव्हाण यांनी तेजस मोरे या व्यक्तीनेच "स्टिंग ऑपरेशन' केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणावरुन मोरे यांनी आता थेट चव्हाण यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. "चव्हाण यांनी खोटे आरोप करून आपली बदनामी केली आहे. त्यांनीच माझी फसवणूक केली आहे.' असा उल्लेख मोरे यांनी आपल्या तक्रार अर्जामध्ये केला आहे.
भाजपचे गिरीश महाजन यांच्यासह काही नेत्यांना पुणे पोलिसांकडून अडकविण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल फडणवीस यांनी विधानसभेमध्ये आवाज उठविला होता. त्याचबरोबर फडणवीस यांनी सरकारी वकील प्रवीण चव्हाण, पुणे पोलिस दलातील सहाय्यक पोलिस आयुक्त सुषमा चव्हाण यांच्यास अन्य वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे संभाषण असलेला पेनड्राईव्ह विधानसभेत सादर केला होता. त्यावरुन मोठ्या प्रमाणात गदारोळ उठला होता. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याप्रकरणाची दखल घेऊन चौकशी करु, असे स्पष्ट केले होते. दरम्यान, चव्हाण यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये तेजस मोरे नावाच्या व्यक्तीने घड्याळ बसविले, त्यातील कॅमेऱ्याने चित्रीकरण केले, मात्र तसे संभाषण नसल्याचे सांगितले होते. दरम्यान, मोरे यांनी देखील पुढे येऊन चव्हाण यांच्यावर आरोप केले होते.
दरम्यान, चव्हाण यांच्याकडूनही तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची चर्चा सुरु होती. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. मोरे यांनी त्यांच्याविरुद्ध चव्हाण यांनी केलेले आरोप खोडून काढले आहेत. मोरे यांच्या वकीलाने शनिवारी सायंकाळी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. त्यामध्ये '' चव्हाण यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. त्यामुळे माझी बदनामी झाली आहे. चव्हाण यांनीच माझी फसवणूक केली आहे.'' असे संबंधित तक्रार अर्जामध्ये नमूद करण्यात आले आहे. ""तेजस मोरे यांच्या वकीलाने शनिवारी सायंकाळी आमच्याकडे तक्रार अर्ज केला आहे. संबंधित अर्जाची चौकशी केली जाईल. त्यानंतर पुढील प्रक्रिया होईल.''अनिता मोरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शिवाजीनगर पोलिस ठाणे.हे पण वाचा-
शहर
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावणार; अवघ्या २ तासांत पार होणार प्रवास!
- एका युगाचा अंत! क्रिकेट विश्वाला धक्का, न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
- अमिताभ बच्चनही ज्याच्या प्रेमात! १०० वर्षांची परंपरा असलेला 'सोहन हलवा'; पाकिस्तानातून थेट 'बिग बीं'साठी स्पेशल पार्सल
- अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 'फटका' देणाऱ्या गँगचा पर्दाफाश! कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीला बेड्या
महाराष्ट्र
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावणार; अवघ्या २ तासांत पार होणार प्रवास!
- एका युगाचा अंत! क्रिकेट विश्वाला धक्का, न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
- अमिताभ बच्चनही ज्याच्या प्रेमात! १०० वर्षांची परंपरा असलेला 'सोहन हलवा'; पाकिस्तानातून थेट 'बिग बीं'साठी स्पेशल पार्सल
- अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 'फटका' देणाऱ्या गँगचा पर्दाफाश! कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हा
- हैदराबादमध्ये धक्कादायक घटना: प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि युट्युबर 'मसूद चांदी'ची मेहुण्याकडून निर्घृण हत्या!
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- रायगड हादरले! आईने चार मुलांना विष पाजून स्वतःही संपवले आयुष्य; दोन मुलींचा मृत्यू, तर दोन मुलांची प्रकृती गंभीर!
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
राजकीय
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
इतर
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
देश विदेश
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
- आसाम: जोरहाट एअरबेसवर लँडिंगवेळी भारतीय वायुसेनेचे एएन-३२ विमान कोसळले; आग लागल्याने खळबळ
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या

























Subscribe to my channel


