राहुल गांधी यांच्याविरोधात पुणे न्यायालयात दावा, सावरकर कुटुंबियांची बदनामीची तक्रार

पुणे: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने करून बदनामी करणाऱ्या राहुल गांधी यांना थेट न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय सावरकर कुटुंबीयांनी घेतला आहे. या प्रकरणी सात्यकी सावरकर यांनी पुणे न्यायालयात दावा दाखल केला आहे.

इंग्लंड येथील एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी खोटी माहिती देऊन त्यांचा अपमान केला. सावरकर यांच्याविषयी मते कलुषित करण्याच्या दृष्टीने आणि बदनामी करण्यासाठी राहुल गांधी यांनी अपमानजनक वक्तव्य केले आहे. त्याची शिक्षा मिळावी यासाठी न्यायालयात जाण्याचा निर्णय आम्ही कुटुंबीयांनी घेतला असल्याचे सात्यकी सावरकर यांनी सांगितले.

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *