
नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंडखोरीमुळे शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. अखेरीस न्यायालयामध्ये या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली, यावेळी शिवसेना आणि शिंदे गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला असून दोन्ही गटाला प्रतिज्ञापत्र सादर करण्यास कोर्टाने सांगितले आहे. या प्रकरणावर आता 1 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. तसंच मंगळवारपर्यंत शिवसेना आणि शिंदे गटाला प्रतिज्ञापत्र सादर करण्यास आदेश दिले आहे.
शिंदे गटाने शिवसेनेत बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. आज सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश एन.व्ही. रामन्ना यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय पीठापुढे ही सुनावणी पार पडली. शिवसेनेच्या 5 याचिकांवर सुनावणी झाली. एकनाथ शिंदेंच्या वतीने वकिल हरिश साळवे , निरज कौल यांनी युक्तिवाद केला. तर शिवसेनेच्या वतीने वकिल कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. तर राज्यपालांच्या वतीने वकील तुषार मेहता यांनी बाजू मांडली.
बंडखोरांचा मुद्दा हा न्यायप्रवीष्ठ होता पण तरीही एकनाथ शिंदे यांचा शपथविधी पार पडला. राज्यपालांनीही या आमदारांच्या गटाला बहुमत चाचणी घेण्यास परवानगी दिली. हे सगळं न्यायाची पायमल्ली करण्याची घटना होती. राज्यपालांनी शिंदे यांना शपथ दिली. त्यांना माहिती होत की, शिंदेंच्या अपात्रेचा मुद्दा हा उपाध्यक्षांकडे प्रलंबित आहे. जोपर्यंत कुठलाही सदस्य पात्र आहे की अपात्र आहे, हे सिद्ध होत नाही. पण राज्यपालांनी सभागृहात बहुमत चाचणी करण्यास परवानगी दिली. ज्या प्रकार उपाध्यक्षांवर कारवाई करण्यात आली तशीच कारवाई बहुमत चाचणीवरही करता यायला हवी होती, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला.
तसंच, आमदारांच्या अयोग्यतेवर कोर्टाने स्थगिती दिली. पण 10 व्या सुचीनुसार कारवाईला कशी स्थगिती देऊ शकतो. या प्रकरणाला जेवढा उशीर केला जाईल का पेचप्रसंग आणखी वाढणार आहे. ज्या कायद्याने पक्ष बदलण्यास रोखण्यात आले होते. त्यालाच कायद्याने संरक्षण दिले जात आहे, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला.
शिंदे गट हा कोणत्याही पक्षात सामील झाला नाही. पण तरीही शपथविधी झाला. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवले पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे वकील मनु सिंघवी यांनी केली. तर शिंदे गटाकडून ख्यातनाम वकील हरीश साळवे यांनी बाजू मांडली.
शिंदे गटाला अपात्र ठरवण्याचा मुद्दा इथं लागू होत नाही. शिंदे गटाने अजूनही शिवसेना सोडलेली नाही. ज्याच्याकडे जास्त जागा आहे तो लिडर असल्याचं सांगत आहे. हेच विधानसभा अध्यक्षांनी मान्य केलं आहे. त्यामुळे शिंदे गट अपात्र ठरू शकत नाही, असा युक्तिवाद साळवे यांनी केला.
यावर कोर्टाने तुम्ही हायकोर्टामध्ये का गेला नाही, असा सवाल केला आहे. हे प्रकरण संवदेनशील आहे. जर आमदारांनी पक्ष सोडला आहे, तर फुटला कसा? असा सवालही केला आहे.
तर, आम्हाला आठ दिवसांची मुदत वाढवून द्यावी, या प्रकरणावर काही घटनात्मक मुद्दे आहे. त्या मांडण्यासाठी वेळ हवा आहे, अशी मागणी साळवे यांनी केली.
हरीश साळवे यांनी 8 दिवसांची मुदत मागितल्यामुळे शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी जोरदार आक्षेप घेतला.
सुप्रीम कोर्टामध्ये खंडपीठाने या प्रकरणामध्ये बरेच कायदेशीर पेच आहे. त्यामुळे या प्रकरणावर मोठ्या खंडपीठापुढे सुनावणी झाली पाहिजे, असं मत नमूद केलं आहे..
तर, राज्यपालांच्या वतीने तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला आहे.
शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढले होते. एकत्र लोकांकडे मत मागण्यासाठी गेले होते. मग आज पक्षातील दोन गट झाले तर त्याच गैर काय आहे, असा युक्तिवाद तुषार मेहता यांनी केला आहे.
तर कपिल सिब्बल यांनी सुनावणी पुढे ढकलली असेल तर महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती ही जसै थे ठेवावी, अशी मागणी केली. पण, कोर्टाने सिब्बल यांच्या मागणीवर कोणताही निर्णय दिला नाही. आता 1 ऑगस्टला महत्त्वाची सुनावणी होणार आहे.
शहर
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावणार; अवघ्या २ तासांत पार होणार प्रवास!
- एका युगाचा अंत! क्रिकेट विश्वाला धक्का, न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
- अमिताभ बच्चनही ज्याच्या प्रेमात! १०० वर्षांची परंपरा असलेला 'सोहन हलवा'; पाकिस्तानातून थेट 'बिग बीं'साठी स्पेशल पार्सल
- अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 'फटका' देणाऱ्या गँगचा पर्दाफाश! कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीला बेड्या
महाराष्ट्र
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावणार; अवघ्या २ तासांत पार होणार प्रवास!
- एका युगाचा अंत! क्रिकेट विश्वाला धक्का, न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
- अमिताभ बच्चनही ज्याच्या प्रेमात! १०० वर्षांची परंपरा असलेला 'सोहन हलवा'; पाकिस्तानातून थेट 'बिग बीं'साठी स्पेशल पार्सल
- अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 'फटका' देणाऱ्या गँगचा पर्दाफाश! कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हा
- हैदराबादमध्ये धक्कादायक घटना: प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि युट्युबर 'मसूद चांदी'ची मेहुण्याकडून निर्घृण हत्या!
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- रायगड हादरले! आईने चार मुलांना विष पाजून स्वतःही संपवले आयुष्य; दोन मुलींचा मृत्यू, तर दोन मुलांची प्रकृती गंभीर!
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
राजकीय
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
इतर
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
देश विदेश
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
- आसाम: जोरहाट एअरबेसवर लँडिंगवेळी भारतीय वायुसेनेचे एएन-३२ विमान कोसळले; आग लागल्याने खळबळ
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या

























Subscribe to my channel


