Madhya Pradesh News: दहशतवादविरोधी मशाल रॅलीत मोठी दुर्घटना, ३० जण गंभीर जखमी

Madhya Pradesh : मध्यप्रदेशातील खंडवा शहरात शुक्रवारी दहशतवाद विरोधी मशाल रॅलीत अचानक मशालींचा भडका उडाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत रॅलीत सहभागी झालेले ३० जण होरपळले होते. यामधील १५ जणांची प्रकृती गंभीर असून या सर्वांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने आयोजकांपैकी १८ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

शुक्रवारी खंडवा शहरात दहशतवाद विरोधी मशाल रॅली काढण्यात आली होती. या रॅली दरम्यान अचानक आग लागल्याने रॅलीत सहभागी झालेल्यांपैकी ३० जण होरपळले होते. या घटनेमुळे घटनास्थळावर गोंधळ उडाला होता. जखमी झालेल्या १५ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खंडवा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Jammu & Kashmir Weather : थंडीची लाट! श्रीनगरमध्ये तापमान -1°C, उत्तर भारतात वाढला थंडीचा कडाका

महत्वाचे म्हणजे जिल्हा प्रशासनाची परवानगी घेऊन ही रॅली काढण्यात आली होती. जरी प्रशासनाकडून परवानगी घेऊन ही दहशतवाद विरोधी रॅली काढण्यात आली होती तरीही आयोजकांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी १८ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply