Risod Accident Today : प्रयागराजला जाण्याची इच्छा अधुरी राहिली; कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांच्या कारला भीषण अपघात

Washim : परभणीच्या जिंतूर येथील तीन भाविक प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्याला निघाले होते. मात्र, या भाविकांच्या कारला अपघात झाल्याची घटना घडली आहे. वाशिमच्या रिसोड शहराजवळ सेनगाव मार्गावर शनिवारी अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं.

प्रयागराजमधील कुंभमेळ्याला देशभरातून भाविक येत आहेत. या कुंभमेळ्याला भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. देशासहित राज्यभरातील भाविक या कुंभमेळ्याला हजेरी लावत आहेत. महाराष्ट्रातील अनेक भाविक प्रयागराजला निघाले आहेत. याच कुंभमेळ्याला जिंतूरमधून निघालेल्या भाविकांचा रिसोडमध्ये अपघात झाल्याची घटना घडली आहे.

नेमकं काय घडलं?

परभणीच्या जिंतूरचे भाविकांच्या कार चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर रस्त्याच्या कडेला नाल्यावर जाऊन अडकली. यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, कार नाल्यावर अडकल्याने मोठा अपघात टळला आहे. त्यामुळे या अपघातात कोणालाही इजा झालेली नाही.

रिसोड सेनगाव मार्गावर अपघाताची मालिका सुरुच आहे. एकापाठोपाठ एक या ठिकाणी दुर्घटना होतच आहे. रिसोड सेनगाव राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या सुरू आहे. अत्यंत संथगतीने सुरू असलेल्या या रस्त्याच्या कामामुळे दुर्घटना होत आहेत, असा आरोप केला जात आहे.

सेनगावकडून रिसोडकडे येणाऱ्या बाजूने रस्ता काम करत असताना वाहतूक सुरू करण्यापूर्वी रस्त्यावरील पडलेली चुरी माती आणि त्यावर असलेला रिकामा बारदाना हे हटविण्यात आलेलं नाही. मार्गावर टाकलेल्या दुभाजकाजवळ रस्ता अरुंद झालेला आहे. यामुळे दुभाजक आणि रस्ता हा नवीन वाहनधारकांना दिसत नाही. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा सूचना फलक लावलेला नाही.

अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा असलेला हा रस्ता दिवसेंदिवस धोकादायक ठरत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात. जेणेकरून पुढच्या दुर्घटना टाळता येईल, अशी मागणी वाहनधारकांकडून व्यक्त होत आहे. तसेच या रस्त्यावरील वाढत्या अपघातामुळे वाहनधारकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply