Uttarakhand Tunnel Rescue : ब्रेकिंग! १७ दिवसानंतर सुटकेचा नि:श्वास; उत्तरकाशी बोगद्यातून मजुरांना बाहेर काढण्यात यश

Uttarakhand Tunnel Rescue : उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या कामगारांबद्दल एक महत्वाची आणि सर्वात मोठी बातमी. गेल्या १७ दिवसांपासून ४१ मजूरांचा बाहेर पडण्यासाठी सुरू असलेला संघर्ष आणि त्यांच्या सुटकेसाठी राबणाऱ्या हातांना, बचावपथकाला, अखेर यश आले असून आज १७ व्या दिवशी कामगारांना बाहेर काढण्यात यश आले. उर्वरित कामगारांना बाहेर काढण्याचे काम सध्या सुरू आहे. या कामगारांच्या सुटकेने त्यांच्या घरी येण्याची वाट पाहत असलेल्या कुटुंबीयांनी अखेर सुटकेचा निःश्वास घेतला.

Lalit Patil Case : ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेट: पोलिसांकडून ससूनच्या कर्मचाऱ्यासह कॉन्स्टेबलला अटक

दिवाळीच्या दिवशी सकाळी बोगद्याचं काम सुरु असताना मातीचा ढिगारा खाली आला आणि ४१ कामगार आत अडकले होते. त्यांच्या सुटकेसाठी गेल्या १७ दिवसांपासून बचावकार्य सुरू होते. ऑगर मशिनने या मजुरांना बाहेर काढण्यासाठी खोदकाम करण्यात आले. अखेर १७ व्या दिवशी हे खोदकाम पुर्ण झाले अन् मजुरांना बाहेर काढण्यात आले.

मात्र गेल्या १७ दिवसांपासून हे मजुर या बंद बोगद्यात अडकले होते. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीचा विचार करता सर्वप्रथम त्यांना रुग्णालयात नेण्यात येणार आहे. त्यासाठी सिलक्यारा बोगद्याजवळ रुग्णवाहिका देखील दाखल झाल्या आहेत. एनडीएआरएफचे जवान हे सिलक्यारा बोगद्यात दाखल झाले असून यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिहं धामी देखील तिथं दाखल झाले आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply