Kalyan News : रेल्वे स्टेशनजवळ पंचनाम्यासाठी गेले, API घटनास्थळी पोहोचताच नको ते घडलं; लोकलच्या धडकेनं...


Thane (Kalyan) : मध्य रेल्वेच्या तानशेत खर्डी स्टेशन दरम्यान रात्री बाराच्या सुमारास एका तरुणीचा मृतदेह असल्याची माहिती कल्याण रेल्वे पोलिसांना मिळाली. या मृतदेहाचा पंचनामा करण्यासाठी कल्याण रेल्वेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास गर्जे घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करत असताना अचानक दोन्ही बाजूंनी आलेल्या गर्जे अंदाज न आल्याने गर्जे यांना लोकलची धडक लागल्याने ते गंभीर जखमी झाल्याची घटना आज शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. जखमी गरजे यांना उपचारासाठी नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती कल्याण रेल्वेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी दिली.

काल रात्री उशिरा तानशेत खर्डी दरम्यान रेल्वे ट्रॅक लगत एक तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती रेल्वे मोटरमनकडून रेल्वे पोलिसांना देण्यात आली. कल्याण रेल्वे पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास गर्जे पहाटेच्या अंधारात घटनास्थळी पंचनामा करत असताना अचानक दोन्ही बाजूंनी एकाच वेळी लोकल आल्या. लोकलचा अंदाज न आल्याने लोकलची धडक लागून गर्जे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Dombivli : बोर्डाच्या पेपरपूर्वीच काळाचा घाला, डोंबिवलीतल्या विद्यार्थिनीचा मृत्यू, रेल्वेट्रॅकजवळ मृतदेह; आई-बापाचा मन हेलावणारा आकांत

रेल्वे ट्रॅकशेजारी विद्यार्थिनीचा मृतदेह

दरम्यान, डोंबिवलीच्या १६ वर्षीय विद्यार्थिनीचा मृतदेह मंगळवारी सायंकाळच्या सुमारास आसनगाव वाशिंद रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळाशेजारी आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही विद्यार्थिनी डोंबिवलीमधील एका शाळेत दहावी इयत्तेत शिकत होती. २२ तारखेला तिचा पहिला पेपर होता. मात्र त्याआधीच तिचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळला. कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात या प्रकरणी नोंद करण्यात आली आहे. या मुलीचा ट्रेनमधून पडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे. हा अपघात आहे की घातपात? याचा कल्याण रेल्वे पोलीस पुढील तपास करत आहेत .दरम्यान,१०वीचा पेपर तोंडावर असताना ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply