आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचा थरार सुरु आहे. क्रिकेट चाहत्यांना दररोज एकसेएर सामने पाहायला मिळत आहेत. स्पर्धेत पहिले 6 दिवस दुबळ्या समजल्या जाणाऱ्या संघांनी उल्लेखनीय कामगिरी करत टफ फाईट दिली आहे. नेपाळ, यूएसए, नेदरलँड्स या सारख्या संघांना विजयी होता आलं नाही, मात्र त्यांनी प्रतिस्पर्धी संघांना सहजासहजी जिंकून दिलं नाहीय. त्यामुळे अपवाद वगळला तर एकही सामना एकतर्फी झाला नाही. त्यामुळे चाहत्यांना उलटफेर पाहण्याची प्रतिक्षा कायम होती. झिंबाब्वेने चाहत्यांनी ही प्रतिक्षा संपवलीय. झिंबाब्वेने तिन्ही फॉर्मेटमध्ये वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला शुक्रवारी 13 फेब्रुवारीला लोळवलंय.
बी ग्रुपमधील झिंबाब्वेने कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर 170 रन्सचं टफ टार्गेट ठेवलं होतं. झिंबाब्वेने त्यानंतर विजयी धावांचा पाठलाग करणाऱ्या कांगारुंना झटपट आणि ठराविक अंतराने झटके देत 19.3 ओव्हरमध्ये 146 रन्सवर रोखलं. झिंबाब्वेने अशाप्रकारे 23 धावांनी हा सामना जिंकला.
झिंबाब्वेकडून 2007 ची पुनरावृत्ती
झिंबाब्वेने या विजयासह 2007 ची पुनरावृत्ती केली. झिंबाब्वेने 2007 साली पहिल्याच टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतही रिकी पॉन्टिंग याच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियाला संघाला पराभूत केलं होतं. त्यानंतर आता झिंबाब्वेने पुन्हा कांगारुंना पराभवाचं पाणी पाजलं.
झिंबाब्वेचा सलग दुसरा विजय
झिंबाब्वेचा हा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला. झिंबाब्वेने याआधी 9 फेब्रुवारीला ओमानवर मात केली होती. झिंबाब्वेने सलग दुसऱ्या विजयासह सुपर 8 साठी दावा मजबूत केला आहे. आता झिंबाब्वे या मोहिमेतील आपला तिसरा सामना हा 17 फेब्रुवारीला आयर्लंड विरुद्ध खेळणार आहे. मात्र त्याआधीच झिंबाब्वेचं सुपर 8 चं चित्र स्पष्ट होणार आहे.
श्रीलंका-ऑस्ट्रेलिया सामना निर्णायक
आता झिंबाब्वे सुपर 8 मध्ये पोहचणार की नाही? हे श्रीलंका-ऑस्ट्रेलिया सामन्याच्या निकालानंतर अधिक स्पष्ट होणार आहे. श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना 16 फेब्रुवारीला होणार आहे. दोन्ही संघांचा हा तिसरा सामना असणार आहे. श्रीलंकेने दोन्ही सामने जिंकलेत. तर ऑस्ट्रेलियाने 2 पैकी 1 सामना जिंकलाय. त्यामुळे श्रीलंकेने सोमवारी कांगारुंना पराभूत केलं तर ते सुपर 8 मध्ये पोहचतील. तसेच ऑस्ट्रेलियाचं आव्हान संपुष्टात येईल आणि झिंबाब्वेही सुपर 8 मधून क्वालिफाय होईल. मात्र ऑस्ट्रेलिया जिंकल्यास त्यांचेही 4 गुण होतील. अशा परिस्थितीत झिंबाब्वेला स्वत:च्या जोरावर सुपर 8 मध्ये पोहचण्यासाठी आयर्लंडवर मात करावी लागेल.
…तर भारत-झिंबाब्वे सामना होणार
तसेच श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यास सुपर 8 मध्ये टीम इंडिया विरुद्ध झिंबाब्वे यांच्यात सामना होईल. हा सामना चेपॉक स्टेडियममध्ये खेळवण्यात येईल. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांचं बी ग्रुपमधील श्रीलंका-ऑस्ट्रेलिया आणि झिंबाब्वे विरुद्ध आयर्लंड या सामन्यांकडे बारीक लक्ष असणार आहे.
बी ग्रुपमधील पॉइंट्स टेबल
बी ग्रुपमधून श्रीलंका आणि झिंबाब्वे दोन्ही संघ अजिंक्य आहेत. मात्र श्रीलंकेचा नेट रनरेट हा झिंबाब्वेच्या तुलनेत चांगला आहे. त्यामुळे श्रीलंका पहिल्या आणि झिंबाब्वे दुसऱ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलिया 1 विजयासह तिसऱ्या क्रमांकावर आहे. आयर्लंड आणि ओमानने दोन्ही सामने गमावले आहेत.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
गुन्हा
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
राजकीय
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- बिहारमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता: नितीश कुमार राज्यसभेवर, मुख्यमंत्रिपदाची सूत्रे भाजप हाती घेणार?
- बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ? नितीश कुमार राज्यसभेवर, भाजपला मुख्यमंत्रीपदाची संधी.
- केजरीवाल-सिसोदिया यांना दिलासा, ‘आप’ला राजकीय बळ; काँग्रेसला आगामी निवडणुकांची चिंता
इतर
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
- सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण: सनस्क्रीन वापरताना या महत्त्वाच्या चुका टाळा!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती

























Subscribe to my channel


