एखाद्या मागे शुक्लकाष्ठ लागलं तर त्याची साडेसाती काही केल्या जात नाही. अफगाणिस्तान संघाच्या बाबतही काहीसं असंच होताना दिसत आहे. आयसीसी मेन्सट टी-20 वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानची कामगिरी अत्यंत सुमार राहिली. अफगाणिस्तानला न्यूझीलंडकडून 5 गडी राखून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर साऊथ आफ्रिकेने तर अफगाणिस्तानचा कचराच केला. डबल सुपर ओव्हरमध्ये साऊथ आफ्रिकेने अफगाणिस्तानच्या संघाला पराभूत केलं. एकामागून एक असे दोन पराभव स्वीकारावे लागल्याने अफगाणिस्तानचा संघ टीममधून बाहेर जाण्याची शक्यता आहे. ग्रुप डीमध्ये आता अफगाणिस्तानची भिडत संयुक्त अरब अमिरातसोबत होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच अफगाणिस्तानवर आणखी एक संकट कोसळलं आहे.
अफगाणिस्तानला सुपर 8मध्ये जाण्यासाठी दोन्ही सामने जिंकावे लागणार असून विजयाची मार्जिन मोठी ठेवावी लागणार आहे. तेव्हाच गुण तालिकेत चांगलं रँकिंग मिळण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडी सुरू असतानाच अफगाणिस्तान संघाला एक मोठा झटका बसला आहे. टीमचे परफॉर्मेन्स ॲनालिस्ट केसी रामा सुब्रमणियन यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. नवी दिल्लीतच त्यांच्या छातीत तीव्र वेदना झाल्याने मायनर अटॅक आला. डेली मिररच्या वृत्तानुसार सुब्रमणियन यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर त्यांना लगेच फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
प्रकृती कशी ?
डॉक्टरांनी त्यांची अँजिओप्लास्टी केली आहे. आता त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचं सांगितलं जात आहे. टीमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुब्रमणियन यांची प्रकृती आता पूर्वीपेक्षा चांगली आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही होत असून त्यांच्यावरचं मोठं संकट टळलं आहे. सुब्रमणियन हे मूळचे चेन्नईचे आहेत. मात्र, अफगाणिस्तानी संघामधील ते एक महत्त्वाचे आणि उत्कृष्ट सदस्य मानले जातात. तसेच ते स्पोर्ट्स ॲनालिटिक्स कंपनीचे डायरेक्टरही आहेत.
कधी घडली घटना ?
ही घटना अफगाणिस्तान आणि साऊथ आफ्रिके दरम्यानच्या रोमांचक सामन्यानंतर झाली आहे. ही अफगाणिस्तानची ऐतिहासिक मॅच होती. हा सामना सुपर ओव्हरपर्यंत गेला होता. या सामन्यामुळे दोन्ही संघाच्या खेळाडूंचा चांगलाच घामटा निघाला होता. दोन्ही खेळाडू मानसिक दबावाखालीही आले होते. साऊथ आफ्रिका सारख्या बलाढ्य संघाच्या विरोधात अफगाणिस्तानने चांगलीच झुंज दिली होती. सामना हाता तोंडाशी आलेला असतानाच अफगाणिस्तानचा चटका लावणारा पराभव झाला होता. या सामन्यात रहमानुल्लाह गुरबाजची कामगिरी ही वाखाणण्यासारखी होती.
करो या मरो
अफगाणिस्तानच्या संघाला सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात पराभव पत्कारावा लागल्याने त्यांचं सुपर-8मध्ये जाणं कठीण झालं आहे. अफगाणिस्तानच्या संघाची 16 फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये यूएईसोबत भिडत होणार आहे. यावेळी करो या मरोची स्थिती असणार आहे. शिवाय मोठ्या फरकाने जिंकण्याचाही दबाव असमार आहे. त्यानंतर अफगाणिस्तानचा मुकाबला 19 फेब्रुवारी रोजी कॅनडाच्या संघाबरोबर होणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये होणार आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
महाराष्ट्र
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
गुन्हा
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

