Sunetra Pawar : त्या ३५ आमदारांचाच सुनेत्रा पवारांना पाठिंबा, राष्ट्रीय अध्यक्षपदावरून रोहित पवारांना नेमकं काय म्हणायचंय?

image

Rohit Pawar reaction to Sunetra Pawar becoming NCP president : सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा होणार, यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झालेय. यावरून रोहित पवार यांनी मोठं वक्तव्य केलेय. सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची घोषणा कुणीही करू देत. पण ३५ आमदारांनी आणि ३२ प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करावी असे पाठिंब्याचे पत्र दिले होते, त्या सर्व आमदारांचे मनापासून अभिनंदन करतो, असे रोहित पवार म्हणाले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष असतील, याबाबत २६ फेब्रुवारी रोजी अधिकृत घोषणा होईल, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली होती. यावर रोहित पवार यांनी निशणा साधलाय.

रोहित पवार म्हणाले की, "काल राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) बैठक झाली, त्यामध्ये २६ तारखेला राष्ट्रीय अध्यक्षपदाचा निर्णय होणार असल्याचे मला टीव्हीच्या माध्यमातून समजले. ज्या ३५ आमदारांनी सुनेत्रा काकींचे नाव राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून प्रस्तावित केले, त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो. त्यांनी पुढे असेही नमूद केले की, "जवळपास ३२ ते ३३ प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सुद्धा कागदावर लिहून दिले आहे की सुनेत्रा काकीच अध्यक्ष असाव्यात. घोषणा कोणीही केली असली तरी, तिथले आमदार आणि पदाधिकारी सुनेत्रा काकींच्या सोबत आहेत, हे महत्त्वाचे आहे. त्यांना आमचा बाहेरून पाठिंबा आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *