
Pune : दहावीच्या गणित-१ आणि गणित-२ या विषयांचे पेपर फुटल्याचा टेलिग्रामवर करण्यात आलेला दावा फोल ठरला आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात पेपर प्रत्यक्षात फुटले नव्हते, तर केवळ विद्यार्थ्यांकडून पैसे उकळण्यासाठी हा बनाव रचल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी या प्रकरणी चैतन्य विनोद शेंडे (१८, रा. चंद्रपूर) याला अटक केली आहे. आरोपीने टेलिग्रामवर एक ग्रुप तयार करून त्यामध्ये दहावीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिका आधीच मिळवून देण्याचा दावा केला होता.
काय होती मोडस ऑपरेंडी?
परीक्षेच्या एक दिवस आधी टेलिग्रामवर पासवर्डने संरक्षित पीडीएफ फाइल अपलोड करण्यात येत असे. त्यानंतर संबंधित ग्रुपमध्ये संदेश टाकून ६०० रुपयांत प्रश्नपत्रिका मिळतील, असे आमिष दाखवून विद्यार्थ्यांकडून पैसे मागितले जात होते.
एडिट फीचरचा वापर
काही विद्यार्थ्यांनी पैसे पाठवल्यानंतर आरोपी त्यांना त्वरित ब्लॉक करत असल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर परीक्षा संपल्यानंतर प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका मिळवून आरोपीने टेलिग्रामवरील आधी अपलोड केलेली फाइल बदलली. त्यामुळे त्या फाइलची अपलोडची वेळ जुनी दिसत असल्याने जणू परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका अपलोड केली होती, असा आभास निर्माण होत होता.
शिवाजीनगर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीला चंद्रपूर जिल्ह्यातून अटक केली. टेलिग्राम ग्रुपवर पाठवलेल्या क्यूआर कोडच्या तपासातून आरोपीचा माग काढण्यात पोलिसांना यश आले.
टेलिग्रामवर ग्रुप
आरोपीने ‘महाराष्ट्र स्टेट बोर्ड २०२६’ या नावाने टेलिग्रामवर ग्रुप बनवला होता. या ग्रुपमध्ये तो चॅटिंग करून विद्यार्थ्यांना बोर्डाच्या प्रश्नपत्रिका देण्याचे आमिष दाखवत असे. पेपर मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना क्यूआर कोड स्कॅन करून पैसे पाठवण्यास सांगितले जात होते.
पोलिसांनी टेलिग्राम कंपनीशी ई-मेलद्वारे पत्रव्यवहार करून तांत्रिक माहिती मिळवली. या माहितीच्या आधारे आरोपीचा मोबाइल क्रमांक आणि ठिकाण निश्चित करण्यात आले. तपासात आरोपी चंद्रपूर जिल्ह्यातील जटपुरा वॉर्ड परिसरात राहत असल्याचे समोर आले.
शहर
- Pune : पुण्यात 6 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या; आरोपीची फाशीची शिक्षा हायकोर्टाकडून रद्द
- वैद्यकीय शिक्षण मंत्री माधुरी मिसाळ यांचा कॉलम:ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी ‘पल्स वैद्यकीय परिषद’ महत्त्वपूर्ण
- Pune : पुण्यात मोठी कारवाई, टीप मिळताच पोलिसांचा सापळा, फॉर्च्युनर थांबताच 40 लाखांचा मुद्देमाल जप्त
- एन. रघुरामन यांचा कॉलम:वृद्धांना घोटाळ्यांपासून वाचवण्याची वेळ आलीय
महाराष्ट्र
गुन्हा
- Pune : पुण्यात मोठी कारवाई, टीप मिळताच पोलिसांचा सापळा, फॉर्च्युनर थांबताच 40 लाखांचा मुद्देमाल जप्त
- एन. रघुरामन यांचा कॉलम:वृद्धांना घोटाळ्यांपासून वाचवण्याची वेळ आलीय
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:प्रत्येक व्यक्ती, परिस्थितीत ईश्वरास पाहायला हवे
- रश्मी बन्सल यांचा कॉलम :थोडीशी काळजी वाटणे चांगले,अवास्तव चिंता काय कामाची?
राजकीय
- मिरज पंचायत समितीत काँग्रेसची बाजी, भाजपच्या बालेकिल्ल्यात आघाडीचा धक्का
- आरती जेरथ यांचा कॉलम:‘आप’ नेत्यांच्या सुटकेनंतर काँग्रेस पक्ष चिंताक्रांत का?
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
इतर
- सरकार तुमचे बँक खाते गोठवू शकत नाही: आर्थिक संकटाच्या व्हायरल दाव्याची पडताळणी
- नाशिकमध्ये निवडणुकीतील पराभव जिव्हारी, राजकीय नेत्याचा युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला
- राज्यात उन्हाचा कडाका वाढला: उष्माघातापासून बचावासाठी आरोग्य विभागाकडून 'अॅडव्हायजरी' जारी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
- Pune- पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! २३ गावांच्या विकासासाठी ९५४ कोटींचा ‘बूस्टर डोस’
मनोरंजन
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
विडियो गॅलेरी

देश विदेश
- LPG टंचाई: सिलिंडर वाहनांना पोलीस सुरक्षा द्या आणि तात्काळ 'कंट्रोल रुम' उभारा; राज्य सरकारचे जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्देश
- गॅस टंचाई हाताळण्यासाठी केंद्र सरकार सरसावले: हॉटेल्सना पर्यायी इंधन, राज्यांना अतिरिक्त रॉकेल
- मुंबईत खलिस्तानी संघटनेच्या नावाने बॉम्बस्फोटाची धमकी; तपासानंतर अफवा असल्याचे स्पष्ट.
- जागतिक संघर्षात होर्मुझ सामुद्रधुनीतून मार्ग काढत, कच्चे तेल घेऊन ‘शेनलॉन्ग’ मुंबईत दाखल; भारताला तात्पुरता दिलासा.























Subscribe to my channel



