Solapur News : BSC परीक्षेत विद्यार्थ्यांना ५० पैकी ९९ गुण; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातील अजब प्रकार

Solapur News : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातील परीक्षा निकालांचा गजब कारभार समोर आला आहे. येथील शिक्षकांनी पन्नासपैकी ९९ गुण देऊन विद्यार्थ्यांना आश्चर्यकारक धक्का दिला आहे. बीएस्सी सेमिस्टर तीनचा असा अजब निकाल शिक्षकांनी जाहीर केला आहे.

सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात बीएस्सी सेमिस्टर तीनचा निकाल पाहून विद्यार्थ्यांसह पालक चकित झाले आहेत. काही विद्यार्थ्यांना ५० गुणांच्या परीक्षेत एका विषयाला ९९ गुण देण्यात आलेत. विद्यापीठाकडून १३ डिसेंबर २०२३ पासून २२ डिसेंबरपर्यंत बीएस्सी सेमिस्टर ३ च्या १० विषयांच्या परीक्षा पार पडल्या

Parbhani News : शेकडाे भाविकांना अन्नातून विषबाधा; परभणी जिल्हाधिका-यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

यामध्ये विद्यापीठाने ४० गुणांचा लेखी पेपर तर १० गुणांची असाइनमेंट अशी एकूण ५० गुणांची परीक्षा घेतली होती. ५ फेब्रुवारीला विद्यापीठाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर करण्यात आला. क्लेरीकल चुकीमुळे असा प्रकार घडल्याची कबुली विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.

वर्षभर अभ्यास करून विद्यार्थी परीक्षा देतात. या परीक्षांवर त्यांचं पुढील भविष्य अवलंबून असतं. अशात परीक्षांमध्ये गोंधळ होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. अशा घटनांमुळे अनेक विद्यार्थ्यांची मेहनत आणि वर्ष देखील वाया जाते. अशात सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात झालेल्या या घटनेनंतर विद्यार्थ्यांना सेमिस्टर तीनची परीक्षा द्यावी लागणार का? असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात येत आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply