Solapur : अधिकार नसताना परस्पर बांधकाम परवाने दिल्याप्रकरणी सोलापूर महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागातील चार अधिकारी व कर्मचाऱ्यांसह सहा परवानाधारक अभियंतेही कारवाईच्या कचाट्यात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर बेकायदा बांधकाम परवाना प्रकरणातील ९६ पैकी २८ बेकायदा इमारतींचे बांधकाम कोणत्याही नियमात बसत नसल्याने या इमारतींचे पाडकाम करण्याचा प्रस्ताव नगररचना विभाग आणि बांधकाम परवाना विभागाकडून पालिका आयुक्तांना सादर केला जाणार आहे. दरम्यान, संबंधित २८ बेकायदा इमारतींची यादी जाहीर करण्यात आली आहे.
महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागाकडून ऑनलाइन बांधकाम परवाना दिला जातो. परंतु काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ऑनलाइन बांधकाम परवाने न देता आणि स्वतःकडे असे बांधकाम परवाने देण्याचा कोणताही अधिकार नसताना परस्पर बांधकाम परवाने दिल्याचे गेल्या वर्षी उजेडात आले होते. याप्रकरणी उपअभियंता झाकीर नाईकवाडी व श्रीकांत खानापुरे यांच्यासह चार अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. यापैकी झाकीर नाईकवाडी व श्रीकांत खानापुरे हे अद्याप अटकेत आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत असताना महापालिकेतील निवृत्त अभियंते आणि काही परवानाधारक अधिकाऱ्यांनीही काही बेकायदा बांधकाम परवाने दिल्याचे नगररचना कार्यालयाचे म्हणणे आहे. मात्र, त्याची चौकशी रेंगाळली आहे.
Dapoli : दापोलीतील सुवर्णदुर्ग रोप वे ला महायुती सरकारचा हिरवा कंदील |
दरम्यान, डॉ. सचिन ओंबासे यांनी महापालिकेत आयुक्त तथा प्रशासकपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर त्यांनी प्रत्येक विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला आहे. यात बांधकाम परवाना विभागातील कारनामे त्यांच्या निदर्शनास आले आहेत. त्यातूनच बेकायदा बांधकाम परवान्यांचे प्रकरण पुन्हा ऐरणीवर आले आहे. त्यानुसार एकूण ९६ बेकायदा बांधकाम परवाने दिलेल्या आणि बेकायदा बांधकामे झालेल्या इमारतींची छाननी झाली असता त्यातील २८ इमारती पूर्णतः बेकायदा असून, त्या कोणत्याही परिस्थितीत नियमित करता येऊ शकत नाहीत. अशा २८ बेकायदा इमारतींची यादी जाहीर करण्यात आली आहे.
बांधकाम करताना वाहनतळाची व्यवस्था न करता येथे बांधकाम करणे, इमारतीसमोरचा भाग मोकळा न सोडता रस्त्यावर पुढे येऊन फ्रंट मार्जिनवर जादा बांधकाम करणे असे प्रकार सर्रासपणे झाले आहेत. मुस्लिम पाच्छा पेठ, तेलंगी पाच्छा पेठ, बेगम पेठ, सिद्धेश्वर पेठ, दक्षिण सदर बाजार, मजरेवाडी, सिव्हिल लाइन्स, गुरुवार पेठ, साखर पेठ, सलगलरवाडी, रेल्वे लाइन आदी भागात ही बेकायदा बांधकामे झाली आहेत. तथापि, शहरात मुरारजी पेठ, नवी पेठ, गोल्डफिंच पेठ, भवानी पेठ, रविवार पेठ व इतर अनेक भागांतही असंख्य बेकायदा बांधकामे झाली आहेत. यात होणारी कारवाई केवळ हिमनगाचा टोक असून, त्यात महापालिका बांधकाम परवाना विभागासह नगर अभियंता आणि नगररचना विभागातील यंत्रणेची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
शहर
- Manoj Jarange : फडणवीस विचित्र माणूस, आमचं त्यांचं शत्रुत्व नाही, पण...; मनोज जरांगेंची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका
- Vegetable Rate Hike : वांगी चिकनपेक्षाही झाली महाग; पावसामुळे पालेभाज्या, फळभाज्यांचे दर वाढले
- Pune : सॉरी! माझी जगायची इच्छा संपली, हिंजवडीत २१ व्या मजल्यावरून IT इंजिनिअर तरूणीने घेतली उडी
- Pune Aundh : 'बायकोवरून लिंबू फिरव मगच आमदार होशील' हगवणेपेक्षा महाभंयकर गायकवाड; सुनेचा अघोरी छळ अन्..
महाराष्ट्र
- Manoj Jarange : फडणवीस विचित्र माणूस, आमचं त्यांचं शत्रुत्व नाही, पण...; मनोज जरांगेंची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका
- Vegetable Rate Hike : वांगी चिकनपेक्षाही झाली महाग; पावसामुळे पालेभाज्या, फळभाज्यांचे दर वाढले
- Nashik Accident : लग्नाहून येताना काळाचा घाला, नाशिकमध्ये कारचा चक्काचूर, भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू
- Pandharpur : तुळशी पूजा तात्काळ बंद कराव्यात; वारकरी संप्रदायाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
गुन्हा
- Pune : पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Shocking : उद्यानात खेळताना विपरीत घडलं, चिमुकलीची बोटे बेंचमध्ये अडकली
- Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना दुहेरी झटका, टॅरिफ धोरण कोर्टाकडून रद्द; एलन मस्क यांनी सोडली साथ
- Panchkula : एकाच कुटुंबातील ७ जणांनी आयुष्य संपवलं; २ पानी सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर..
- Amritsar Blast : बॉम्ब ठेवायला गेला अन् हातातच फुटला; एक ठार, अमृतसरमध्ये भीतीचे वातावरण