Maharashtra Politics : महायुतीमध्ये पुन्हा वादाची ठिणगी, मंत्री भरत गोगावाले यांची अजित पवारांच्या माजी आमदारावर सडकून टीका

Solapur : अजित पवार गटाचे आमदार राजन पाटील यांनी दोन वर्षापूर्वी भरसभेत लग्नापूर्वी आपल्या पोरांनी लफडे केल्याचा आणि 302 कलम भोगल्याचा अभिमान आहे. असे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. आता या विधानवरूनच शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी काल सोलपुरात एका कार्यक्रमात पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे.

राजन पाटील यांच्याबाबत मी जे काही बोललो ती वस्तुस्थिती आहे. वस्तुस्थिती सांगायला काही हरकत नाही. लोकप्रतिनिधिंनी काय बोलायला पाहिजे, हे कळत नसेल तर आता लोक वेडी राहिलेली नाहीत. लग्नाच्या आधी मुलांच्या गोष्टींची वाहवा करत असतील हे चुकीचं आहे. याचा अर्थ तुम्ही कित्येक महिलांना खराब केले असेल. हे यावरून कळत आहे. तर शिवाजी महाराजांनी पाटलांचा चौरंग केलाच ना, अशा शब्दात गोंगावले यांनी राजन पाटील यांना सुनावलं.

ठाणे महापालिका आम्ही निवडून आणणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यात नुकताच भाजप नेते मंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार घेतला आणि पुन्हा एकदा नाईक आणि शिंदे यांचा वाद चव्हाट्यावर आला. आता त्यावरच मंत्री गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली. महायुतीतील पक्ष एकमेकांच्या जिल्ह्यात बैठका घेतात ही चांगली गोष्ट आहे. आमचा जिथे पालकमंत्री नाहीये तिथे आमचे मंत्री जाऊन बैठक घेतील. त्यात काही हरकत नाही. तर ठाणे महापालिका आम्ही निवडून आणणार असे गोगावले म्हणाले.

Car Accident : प्रयागराजवरून परतताना काळाचा घाला; कारची टँकरला धडक, महिलेचा मृत्यू, मुलगा गंभीर

संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांची संघटना संपवण्याच्या मार्गावर आहे.

उद्धव ठाकरे यांनी आता आमदार आणि खासदारांच्या दर आठवड्याला बैठका घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली. जेव्हा वेळ होती, तेव्हा त्यांना करता आलं नाही. आता हातून गेल्यावर सर्वच परत येईल सांगता येत नाही. कारण एवढी मॅजोरीटी आमच्याकडे आली आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत असलेल्या लोकांना आमच्यासोबत येण्याशिवाय पर्याय राहिला नाही.संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांची संघटना संपवण्याच्या मार्गावर आहे. बहुतेक त्याने संपवली आहे, राहिलेली पण अर्धी अर्धी संपवत चाललेय असा टोला त्यांनी संजय राऊतांना लगावला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply