Solapur Accident : सोलापूर-पुणे महामार्गावर विचित्र अपघात, कंटेनरची बस आणि दुचाकीला धडक; तिघांचा जागीच मृत्यू

Solapur : सोलापूरमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाले आहेत. सोलापूर- पुणे महामार्गावर हा अपघात झाला. भरधाव कंटेनरने मिनी बस आणि दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की तिन्ही वाहनांचे मोठं नुकसान झाले आहे. सोलापूर पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू आहे. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात तीन वाहनांचा अपघात झाला. या अपघातामध्ये ३ जणांचा मृत्यू तर १५ जण जखमी झाले. मोहोळ तालुक्यातील कोळेवाडीजवळील सोलापूर- पुणे महामार्गावर कंटेनर मिनीबस आणि दुचाकीमध्ये हा भीषण अपघात झाला. सोलापूर -पुणे महामार्गावर आधी कंटेनर आणि दुचाकीची धडक झाली. या अपघातानंतर ट्रकने राँग साईडला जाऊन मिनी बसला जोरदार धडक दिली. ट्रकने मिनी बसला धडक दिल्यामुळे मिनी बस महामार्गावर पलटी झाली.

Sambhajinagar News : हॉटेलमध्ये गोंधळ घालत पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण; संभाजीनगरमधील घटना

पंढरपूर-तुळजापूर देवदर्शनाला जाणारे भाविक या मिनी बसमधून प्रवास करत होते. अपघातामध्ये बस चालकासह तिघेजण जागीच ठार झाले. तर १५ जण जखमी झाले. दुचाकीस्वार दयानंद भोसले, मिनी बस चालक लक्ष्मण पवार यांच्यासह एक जण जागीच ठार झाला. कंटेनर मिनी बस आणि दुचाकीचा अपघात झाल्यानंतर महामार्गावर वाहतूक खोळंबली होती. क्रेनच्या सहाय्याने पलटी झालेली मिनीबस बाजूला करण्यात आली. याप्रकरणी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply