Shraddha Walker Case : हत्येपूर्वी श्रद्धा आणि आफताबमध्ये जोरदार भांडण, पोलिसांच्या हाती 'ऑडिओ पुरावा'

Shraddha Murder Case : श्रद्धा हत्याकांडाच्या तपासात गुंतलेल्या दिल्ली पोलिसांच्या हाती आता एक महत्त्वाचा पुरावा लागला आहे. पोलिसांना आफताबचा एक ऑडिओ मिळाला आहे. या ऑडिओमध्ये आफताब आणि श्रद्धा या दोघांमध्ये जोरदार भांडण सुरु असल्याचे ऐकू येत आहेत. इतकंच नाही तर आफताब श्रद्धाला टॉर्चर करत होता हे या ऑडिओवरून सिद्ध झालं आहे.

ऑडिओला मोठा पुरावा मानत दिल्ली पोलीस आता या ऑडिओची चौकशी करणार आहे. या ऑडिओ क्लिमुळे आफताबने श्रद्धाची हत्या नेमकी कशी केली यामागील कारण समजू शकतं असे संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पोलीस ऑडिओ क्लिपमधील आवाज हा आफताबचाच आहे का याची खात्री करण्यासाठी चाचणी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी पोलीस त्याच्या आवाजाचा नमुना घेणार आहेत. सीबीआयची सीएफएसएल टीम आफताबच्या आवाजाचा नमुना घेणार आहेत.

श्रद्धाच्या हत्येनंतरही आफताब त्याच फ्लॅटमध्ये राहत होता. कुणाला तिच्या हत्येचा संशय येऊ नये म्हणून तो श्रद्धाचे सोशल मीडिया अकाउंट वापरत राहिला. आफताबने श्रद्धाच्या खात्यातून 54 हजार रुपयेही ट्रान्सफर केले होते. श्रद्धाचे मोबाइल लोकेशन आणि बँक खात्याच्या तपशीलाच्या मदतीने पोलीस आफताबपर्यंत पोहोचले. आफताबला पोलिसांनी 12 नोव्हेंबरला अटक केली. आफताब सध्या तिहार तुरुंगात आहे.

पोलिसांच्या चौकशीत आफताबनेच श्रद्धाची हत्या केल्याचे सांगितले होते. आफताब हा श्रद्धाचा प्रियकर होता. दोघेही मुंबईचे रहिवासी असून काही दिवसांपूर्वी ते दिल्लीला शिफ्ट झाले होते. दिल्लीत दोघेही मेहरौली येथे फ्लॅट घेऊन लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. आफताबने सांगितले होते की 18 मे रोजी त्याचे श्रद्धासोबत भांडण झाले. यानंतर त्यांनी श्रद्धाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर आफताबने श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे केले. आफताबने हे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले होते. तो रोज रात्री श्रद्धाच्या मृतदेहाचा तुकडा मेहरौलीच्या जंगलात टाकण्यासाठी जात होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply