Sharad Mohol : शरद मोहोळ खून प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी ३० दिवसांची मुदतवाढ

Pune : कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या खून प्रकरणातील आरोपीवर दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी न्यायालयाने पुणे पोलिसांना ३० दिवसांची मुदतवाढ दिली आहे. दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसांची मुदत मिळावी, यासाठी पोलिसांनी अर्ज केला होता.

मोहोळचा पाच जानेवारीला कोथरूडमधील सुतारदरा परिसरात गोळ्या घालून खून करण्यात आला होता. या गुन्ह्यात १६ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

मुख्य सूत्रधार गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार हे असून साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव महिपती कानगुडे, अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले,

Mumbai : धक्कादायक! पत्नी सोबत रहात नाही, पतीने दिली दादर, कल्याण रेल्वे स्टेशन उडून देण्याची धमकी

ॲड. रवींद्र पवार, ॲड. संजय उडान, विठ्ठल शेलार, रामदास ऊर्फ वाघ्या मारणे, धनंजय मारुती वटकर, सतीश संजय शेडगे, नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे आणि संतोष दामोदर कुरपे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहेत. सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

यातील गणेश मारणे वगळता इतर १५ आरोपी विरोधात दोषारोप पत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसांची वाढ मिळाली यासाठी पुणे पोलिसांनी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने पुणे पोलिसांना दोषारोप पत्र दाखल करण्यासाठी ३० दिवसांची मुदतवाढ दिली आली आहे.

उर्वरित ६० दिवसांची मुदतवाढ मिळावी यासाठी पुणे पोलिसांच्यावतीने मोक्का विशेष न्यायालयात अर्ज करण्यात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे करत आहेत.

मोक्कानुसार दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपींची ३० दिवसांची पोलिस कोठडी पोलिसांना मागता येते. इतर गुन्ह्यात हा कालावधी १४ दिवसांचा असतो. तसेच मोक्का कायद्यानुसार गुन्हा दाखल असेल तर न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यासाठी १८० दिवसांची मुदत मिळते. त्यातील ९० दिवस संपण्यापूर्वी मुदतवाढीचा अर्ज करणे गरजेचे असते. त्यानुसार पोलिसांनी अर्ज केल्याने ही मुदतवाढ देण्यात आली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply