संजू सॅमसनImage Credit source: Shubhajit Roy Karmakar/NurPhoto via Getty Images
आयसीसी मेन्स टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारताने अखेर सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. काल कोलकात्यातील ई़़डन गार्डन्समध्ये झालेल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर 5 विकेट राखून विजय मिळवला. या सामन्यात विजयासाठी भारतीय संघासमोर 196 धावांचे लक्ष्य होते. संजू सॅमसनच्या शानदार फलंदाजीमुळे (नाबाद 97) भारतीय संघाने हे लक्ष्य चार चेंडू शिल्लक असताना गाठलं आणि खणखणीत विजय मिळवला.
या विजयासह, भारतीय संघाने टी20 वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे, मात्र वेस्ट इंडिजचा संघ स्पर्धेबाहेर पडला. आता 5 मार्च रोजी, मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सेमीफायनलमध्ये भारतीय संघाचा इंग्लंडशी सामना होईल. तर पहिल्या सेमीफायनलमध्ये 4 मार्च रोजी दक्षिण आफ्रिका आणि न्युझीलंड हे दोघे एकमेकांशी भिडतील.
कालच्या सामन्यात भारतीय संघाकडून संजू सॅमसनने 50 चेंडूत 12 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 97 धावा केल्या. वेस्ट इंडिजविरुद्ध विजयी चौकार मारताना संजू खूप भावूक झाला. तेव्हाच त्याने त्याचं हेल्मेट हवेत फेकलं आणि नंतर दोन्ही हात आकाशाच्या दिशेने करून त्याने देवाचे आभार मानले. त्याचा संघर्ष, त्याच्यावर असलेला दबाव आणि काल मिळालेल्या यशानंतर त्याने समाधानाने घेतलेला श्वास, यातून दिसून आलं. पण हेच विजयी सेलिब्रेशन त्याच्यासाठी महागात पडू शकतं.
संजूविरोधात आयसीसी करणार कारवाई ?
विजयानंतर हेल्मेट फेकून आनंद साजरा करणं संजू सॅमसनला महागात पडू शकतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई देखील करू शकते. खेळाडूंच्या वर्तनाबाबत ICC ची आचारसंहिता खूप कडक आहे. नियमांनुसार, मैदानावर हेल्मेट किंवा बॅट फेकणे गैरवर्तन ठरू शकते. अशा परिस्थितीत, खेळाडूला त्याच्या मॅच फीचा शुल्काचा दंड भरावा लागणं, डिमेरिट पॉइंट्स किंवा निलंबन अशी कारवाई होऊ शकते.
केवळ शिस्त पाळणं हा आयसीसीच्या आचारसंहितेचा उद्देश नाही तर खेळाडू, पंच आणि मैदानावरील इतर कर्मचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणं हेही उद्दिष्ट आहे. हेल्मेट किंवा बॅट अनवधानाने फेकल्याने दुखापत होऊ शकते. म्हणूनच क्रिकेटसारख्या खेळात संयमाला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते.
संजू सॅमसनचं हे सेलिब्रेशन पाहून क्रिकेट चाहत्यांना पूर्वीचा एक प्रसंग आठवू शकतो. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2023 दरम्यान, लखनौ सुपर जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 1 विकेटने विजय मिळवल्यानंतर आवेश खानने त्याचे हेल्मेट जमिनीवर फेकलं होतं. तेव्हा आवेश हा आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरला होता आणि त्यांना फटकारण्यात आले. आता संजू सॅमसनवर आयसीसी काय कारवाई करते का याकडे सर्वांते लक्ष आहे.
शहर
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
महाराष्ट्र

- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
गुन्हा
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel