Raj Thackeray : फाईव्ह स्टार हॉटेलात मेगाप्लॅन! वरळीत ठाकरेंची कोंडी, शिवसेना-भाजपचा मनसेला बिनशर्त पाठिंबा?

Mumbai  : विधानसभा निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणणारी मोठी बातमी समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीला दिसलेली शिवसेना-भाजप-मनसे यांची महायुती विधानसभेला काही जागांवर एकी दाखवण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना-भाजप काही जागांवर मनसेच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा देण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, यात वरळी आणि माहिम या दोन जागांचा समावेश असून या दोन्ही जागा ठाकरे कुटुंबाच्या दृष्टीने संवेदनशील आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यासंदर्भात चर्चा झाल्याचं वृत्त 'एबीपी माझा'ने दिलं आहे. मुंबई विमानतळाजवळील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शनिवारी रात्री तिघा जणांची भेट झाल्याची माहिती आहे. यावेळी तिघांमध्ये दोन तास चर्चा झाली.

शिवडी, वरळी, माहीमसह काही मतदारसंघांमध्ये मनसेच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा देण्याचा महायुतीने प्रस्ताव दिल्याचं बोललं जात आहे. लोकसभेची परतफेड म्हणून महायुती मनसे उमेदवारांना पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे.

Mumbai : कुर्ला येथील शाळेच्या शिक्षकांना दिवाळीच्या सुट्टीत, मतदानाच्या दिवशी निवडणूक कामे; निवडणूक आयोगाची उच्च न्यायालयात माहिती

ठाकरेंसाठी अडचण का?

वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे पुन्हा एकदा विधानसभेच्या रिंगणात नशीब आजमावणार आहेत. मनसेकडून सरचिटणीस संदीप देशपांडे यांचं नाव वरळीसाठी चर्चेत आहे. पक्षाकडून तशी तयारीही सुरु आहे. महायुतीने या ठिकाणी उमेदवार दिल्यास मतविभाजनाचा फटका बसू शकतो. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना पराभूत करण्यासाठी मनसेच्या संदीप देशपांडेंच्या मागे शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी यांच्या महायुतीची ताकद लावली जाण्याची शक्यता आहे.

अमित ठाकरेंचा मार्ग मोकळा?

दुसरीकडे, मनविसे अध्यक्ष आणि राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. ठाकरे कुटुंबातील सदस्य या नात्याने 'उद्धव काका' अमित यांच्याविरुद्ध उमेदवार देणं टाळणार असल्याचं बोललं जातं. त्यामुळे अमित ठाकरेंचा मार्ग आधीच प्रशस्त झाला होता.

ही जागा शिवसेनेकडे असून विद्यमान आमदार सदा सरवणकर हे शिंदेंसोबत आहेत. त्यामुळे अमित यांना पाठिंबा द्यायचा झाल्यास सरवणकरांना माघार घ्यायला लावावी लागेल आणि त्यांचं राजकीय पुनर्वसनही करावं लागेल. मात्र अमित ठाकरेंचा रस्ता सुकर होईल. अशाने अमित ठाकरेंची विधानसभेची धाव सोपी, तर आदित्य यांची मात्र बिकट होऊ शकते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply