Raj Thackeray : '5 वर्ष राणे मुख्यमंत्री असते तर...', तो किस्सा सांगत राज ठाकरेंनी केलं नारायण राणे यांचं कौतुक

Raj Thackeray : ''नारायण राणे यांना ६ महिने वेळ मिळाला होता मुख्यमंत्री म्हणून. पाच वर्ष मिळाली असती, तर आज कोणाला इकडे प्रचार करायला यावं लागलं नसतं'', असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेते आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नारायण राणे यांचं कौतुक केलं आहे. आज कणकवली येथे आयोजित सभेत त्यांनी राणे यांचं कौतुक केलं आहे.

राज ठाकरे म्हणाले की, ''जेव्हा ते (नारायण राणे) मुख्यमंत्री झाले, तेव्ह मला प्रश्न पडला होता की, ते सर्व सांभाळू शकतील का? पण त्यांनी जे केलं. ते भल्याभल्यांना जमले नाही.'' एका किस्स्याची आठवण करून देत ते म्हणाले, ''राणे तुम्ही विसरून गेला असाल. त्यावेळी अनिल शिदोरे, अभत बंग यांना नारायण राणेंकडे घेऊन गेले होते. कुपोषणाचा मुद्दा होता.''

Ulhasnagar Fire : उल्हासनगरमध्ये अग्नितांडव; जे. के. ऑर्किड इमारतीला भीषण आग

ते म्हणाले, ''नारायण राणे यांनी ऐकायला सुरुवात केली. कुपोषित बालमृत्यूचा मुद्दा ते सांगत होते. त्यांनंतर नारायण राणेंनी सभागृहात हा मुद्दा प्रखरपणे मांडला. एखादा विषय समजून घेणे, ते कसं मांडणं, हे ज्याला माहित आहे आज तो माणूस तुमच्यासमोर खासदारकीला उभा आहे.''

उपस्थित लोकांना उद्देशून राज ठाकरे म्हणाले की, ''एक प्रश्न आहे, नुसतं दिल्लीत जाऊन बाकड्यावर बसणारा खासदार पाहिजे की, मंत्री बनून कोकणवासीयांचा विकास करणारा खासदार पाहिजे? मोदींच्या मंत्रिमंडळात ते मंत्री असणार. मी माझे प्रश्न त्यांच्याकडे घेऊन जणार आणि माझ्याकडून ते होणार नाही, असं ते बोलणार नाही, ते नक्की मार्ग काढणार. त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा.''



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply