Rain Update: पुणे, मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता; घाटांतील प्रवाशांना 'सतर्क'तेचा इशारा

Rain Update : पुणे, मुंबईसह राज्यभरातील अनेक जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा इशारा 'सतर्क' या हवामान विषयक माहिती देणाऱ्या संस्थेनं दिला आहे. त्याचबरोबर माळशेज घाट आणि खंडाळा घाटातून प्रवास करणाऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

सतर्कच्या माहितीनुसार, पुणे (दौंड, शिरूर, हवेली, जुन्नर, मावळ, पुणे शहर, पिंपरी चिंचवड), अहमदनगर, नाशिक, ठाणे, पालघर, रायगड, मुंबई आणि उपनगरे, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर इथल्या काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Dhangar Reservation Chaundi : धनगर समाजाचं उपोषण मागे; मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीला यश

घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस

दरम्यान, मावळ, आंबेगाव, जुन्नर तालुक्यांत काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी फ्लॅशफ्लड सारखी स्थिती तयार होऊ शकते. त्याचबरोबर माळशेजघाट, खंडाळाघाट येथून प्रवास करताना नागरिकांनी सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. कारण मुसळधार पावसामुळं डोंगरावरून दगड, माती घसरून येण्याची, झाडे पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply