
Pune : राज्यातील बहुतांश भागात उष्णतेची लाट तीव्र होत असताना, पुण्यातही तापमानाने धोकादायक पातळी गाठली आहे. गेल्या दोन दिवसांत शहरातील तापमान ४० अंशांच्या आसपास राहिले असून, उपनगरांमध्ये ते ४१ अंशांपुढे गेले आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिला आहे. पुढील दोन दिवसांत उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गेल्या चार दिवसांपासून वातावरणातील बदलांमुळे तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. सकाळी दहापासूनच उन्हाची तीव्रता जाणवू लागते आणि दुपारनंतर बाहेर पडणे कठीण होत आहे. मंगळवारीही अशीच परिस्थिती होती. सकाळचा गारवा पूर्णपणे कमी झाला असून, नऊ वाजल्यानंतर ऊन झपाट्याने वाढत आहे. सरकारी सुट्टीमुळे नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळल्याने दुपारी रस्त्यांवर तुलनेने शांतता दिसून आली. संध्याकाळी ऊन कमी झाले तरी हवेत उकाडा कायम राहिला. मध्यवर्ती भागांच्या तुलनेत उपनगरांमध्ये उष्णतेची तीव्रता अधिक जाणवली असून, तापमानात २ ते ३ अंशांचा फरक नोंदवला गेला. पुढील दोन दिवसांत दिवसासोबतच रात्रीचाही उकाडा वाढण्याची शक्यता आहे.
उष्णतेच्या वाढत्या तडाख्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नागरिकांच्या संरक्षणासाठी तीन मानक कार्यपद्धती (एसओपी) जाहीर केल्या आहेत. यामध्ये असंघटित क्षेत्रातील कामगार, खाणकामगार आणि कमी उत्पन्न गटातील नागरिकांना प्राधान्य देण्यात आले आहे.
पहिल्या एसओपीमध्ये रस्त्यावर काम करणारे विक्रेते, बांधकाम मजूर, वाहतूक पोलीस, स्वच्छता कर्मचारी, डिलिव्हरी कर्मचारी आणि रिक्षाचालक यांच्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. हवामान विभागाच्या यलो, ऑरेंज आणि रेड अलर्टनुसार कामाचे वेळापत्रक बदलणे, पुरेशी विश्रांती, पाण्याची उपलब्धता, ओआरएस वितरण, सावलीची व्यवस्था आणि आरोग्य सुविधा बळकट करणे यावर भर देण्यात आला आहे.
दुसरी एसओपी चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाण कामगारांसाठी असून, उष्णतेचा ताण कमी करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यामध्ये थंड विश्रांती केंद्रे, पुरेसा पाणीपुरवठा, योग्य वायुवीजन, कामाचे नियोजन, जॉब रोटेशन, उष्णतेशी संबंधित आजारांची ओळख आणि महिला कामगारांसाठी विशेष सुविधा यांचा समावेश आहे.
तिसऱ्या एसओपीमध्ये उष्णतारोधक गृहनिर्माणावर भर देण्यात आला आहे. अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजनांद्वारे घरांची उष्णतारोधक क्षमता वाढवणे, थंड छप्पर (कूल रूफ), हरित क्षेत्रांचा विकास आणि हवामान-संवेदनशील शहरी नियोजन यांचा समावेश करण्यात आला आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




