Pune Water Supply : पुणेकरांवर पाणीसंकट! खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने घटला; आता किती टक्के पाणी शिल्लक?

Pune Water Supply : पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. पुण्यावर पाणीसंकट आहे कारण पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने घट झाली आहे. खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमध्ये फक्त ३.५८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पुणेकरांना पाणीकपातीची (Pune Water Cut) टांगती तलवार आहे. त्यामुळे पुणेकरांनी पाण्याचा जपून आणि काटकसरीने वापर करावा, असे आवाहन केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जून महिना संपत आला असतानाही पाऊस झालेला नाही. त्यामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पामध्ये म्हणजे चारही धरणामधील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. या चारही धरणांमध्ये फक्त ३.५८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. पुणे शहराला दररोज ०.०५ टीएमसी म्हणजे १४७० एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. याप्रमाणे दर महिन्याला १.५० टीएमसी पाण्याचा वापर पुणे शहरासाठी होतो.

Rohit Pawar : 'मी पालकमंत्री असताना अशा घटना घडल्याच नाहीत', चंद्रकांत पाटील यांच्या दाव्यानंतर रोहित पवार संतापले

जून महिना अखेरीस संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांची पालखी पुणे जिल्ह्यातून जाणार आहे. या पालखी सोहळ्यामुळे अर्धा टीएमसी पाणी कॅनॉलमधून सोडावे लागते. त्यामुळे पालखी सोहळा पुण्यातून मार्गस्थ झाल्यानंतर पाणी कपातीबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पुणेकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार आहे.

पुढच्या काही दिवसांमध्ये पाऊस पडला नाही तरी ३० जुलैपर्यंत हे पाणी पुरेल एवढं पाणीपुरवठा नियोजन केलं असल्याचं जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले आहे. पुण्यामध्ये आणि धरण क्षेत्र परिसरामध्ये अद्याप जोरदार पावसाला सुरुवात झालेली नाही. खडकवासला, पानशेत, टेमघर, वरसगाव या चार धरणांमधून पुण्याला पाणी पुरवठा केला जातो. चारीही धरणात मिळून फक्त ३.५८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply