
Pune Pollution : पुण्यात मागील अनेक दिवसांपासून हवेची (Air) गुणवत्ता खालावली आहे. दिवाळीत खास करून प्रत्येक वर्षी लक्ष्मी पूजनानंतर वायू प्रदूषणात प्रचंड वाढ झाल्याचं चित्र बघायला मिळतं. लक्ष्मीपूजनाला फटाके उडवले जातात आणि त्यामुळे आणखी त्रास होतो. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निर्बंध घालण्यात आले होते. मात्र पुण्यात कुठल्याच उपाययोजना केल्या गेल्या नव्हत्या. इतर वेळी स्वच्छ सुंदर पुणे ज्याला म्हंटल जायचं तिथली परिस्थिती सध्या चिंताजनक असल्याचं चित्र आहे.
फटाक्यांच्या आतिषबाजीने होणारे प्रदूषण यामुळे श्वसनाचे त्रास नागरिकांना होत आहेत. याच कारणामुळे नागरिकही त्रस्त झाल्याचं चित्र आहे. सफर या संस्थेच्या आकडेवारीनुसार पी.एम.2.5 या धूलिकणांचे प्रमाण वाढलं असल्याचं सांगण्यात आलं. PM 2.5 मुळे हृदयविकार, दमा आणि नवजात मुलांच्या वजनात फरक पडणे यांसारख्या आरोग्य समस्यांचा धोका वाढू शकतो. PM 2.5 च्या वाढलेल्या पातळीमुळे दृश्यमानता कमी होऊ शकते आणि हवेत धुके दिसू लागते. सफर संस्थेच्या आकडेवारीनुसार सध्याची पुण्यातील स्थिती ही चिंताजनक आहे.
|
|
पुण्याची सध्याची प्रदूषणाची स्थिती
पु्ण्याचा सध्याचा AQI हा 351 आहे. त्यातच Pollutant चा पीएम हा 2.5 इतका आहे. पुण्यातील इतर शहरांची स्थिती आणि त्यांचा AQI किती आहे, हे सविस्तर जाणून घेऊयात.
| शहर | AQI |
| कोथरुड | 358 |
| शिवाजीनगर | 381 |
| पाषाण | 314 |
| लोहेगाव | 350 |
| कात्रज | 341 |
| निगडी | 350 |
| हडपसर | 335 |
| आळंदी | 311 |
| भोसरी | 424 |
| भुमकर चौक | 314 |
अशी सध्याची पुण्याची स्थिती असली तरीही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून हवेची गुणवत्ता कमी होत नसल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे हवेचं प्रदूषण तेवढचं राहत असल्याचं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलं. दर हिवाळ्यात ही परिस्थिती पाहायला मिळते. या परिस्थितीला inversion असं म्हटलं जातं.
एकंदरीत गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील हवेची गुणवत्ता खालावली आहे. राज्य सरकारकडून यावर सूचना देखील देण्यात आल्यात. त्याचप्रमाणे उच्च न्यायालायाने देखील प्रदूषणावरुन राज्य सरकारला खडेबोल सुनावले. अनेक शहरातील महापालिका प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करतायत. मात्र पुण्यात यातील काहीही करण्यात आले नाही. ना प्रशासनाने काळजी घेतली, ना नागरिकांनी. लक्ष्मी पूजनानंतर मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले, त्यावर कुठलेही निर्बंध नव्हते, वेळीची मर्यादा नव्हती. पुण्यात काल संध्याकाळी 7 वाजल्यापासून 27 आगीच्या घटना घडल्याचंही सांगण्यात आलं. त्यामुळे याबाबत काय करता येईल, यावर काय पावलं उचलली जाणार हे बघणे महत्वाचे ठरेल.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ? नितीश कुमार राज्यसभेवर, भाजपला मुख्यमंत्रीपदाची संधी.
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

