Pune News : गर्लफ्रेंडने संपर्क तोडला, बायफ्रेंड चिडला अन् मध्यरात्री थेट घरात शिरुन गोळीबार केला; गोळीबारानं पुणं पुन्हा हादरलं!

Pune News : पुण्यात मागील काही दिवसांपासून किरकोळ कारणासाठी गोळीबारकेल्याच्या घटना सातत्त्याने समोर येत आहे.क्रिकेटच्या वादातून गोळीबार करण्यात आल्याची घटना ताजी असतनाच आता गर्लफ्रेंडने संपर्क तोडल्याने बॉयफ्रेंडने चिडून तिच्या घराबाहेर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारात गर्लफ्रेंडची बहिण जखमी झाली आहे. तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहे. काल मध्यरात्री पुण्यातीस गंजपेठेत ही घटना घडली आहे. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषी बागुल असं गोळीबार केलेल्या आरोपीचं नाव आहे.

प्रेयसीचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर तिचे आणि आरोपी प्रेम संबंध होते. मात्र काही क्षृल्लक कारणावरुन वाद झाले होते. त्यामुळे प्रेयसीने ऋषीता फोन ब्लॉक केला आणि त्याच्याोबत संपूर्ण संपर्क कमी केला. हे पाहून ऋषीला राग आला. ती भेटत नसल्याचं पाहून ऋषीचा राग अनावर झाला आणि तो थेट प्रेयसीच्या घरी मध्यरात्री पोहचला. त्यावेळी प्रेयसीची बहिण आणि त्याचे वाद झाले. हे सगळा पाहून त्याने थेट प्रेयसीच्या बहिणीवर बंदूक रोखली आणि तिच्यावर गोळीबार करुन तिचा खून करण्याचा प्रयत्न केला. 

Pune News : वाहतूक कोंडी अन् गाडी लावण्यावरुन वाद; रिक्षा चालक निवृत्त पोलिसाच्या हाताला चावला अन् थेट अंगठाच तोडला!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बहिणीचा घटस्फोट झाला असून तिचे आणि आरोपी ऋषी बागुल यांच्यात प्रेम संबंध आहेत. त्या दोघांमध्ये वाद झाल्याने फिर्य़ादी यांच्या बहिणीने ऋषीचा फोन ब्लॉक करुन त्याच्यासोबत संपर्क करणे टाळले. तसेच ती भेटत नसल्यामुळे ऋषीला राग अनावर झाला. रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास तो प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी आला होता. त्यावेळी प्रेयसीच्या बहिणीसोबत त्याचे वाद सुरु झाले. मला जर ती मिळाली नाही तर मी कोणाला सोडणार नाही, ही धमकी दिली आहे घर बाहेरुन लॉक करुन निघून गेला.

हा सगळा प्रकार पाहून दोघीही घाबरल्या त्यांनी थेट पोलिसांशी संपर्क करुन त्यांना या संबंधी माहिती दिली. हे ऐकताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोघींची मदत केली. जखमी झालेल्या बहिणीला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केलं. तिच्यावर उपचार सुरु आहेत. पुण्यात गुन्हेगारीने डोकं वर काढलं आहे. याच गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी पोलीस उपाययोजना करत आहेत. मात्र तरीही गुन्हेगारी संपायचं नाव घेत नाही आहे. 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply