Pune Loksabha Election : पुणे जिल्ह्यात आचारसंहिता भंगाच्या धडाधड तक्रारी; 1 हजार 500 तक्रारींवर कार्यवाही

Pune Loksabha Election : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात ‘सी- व्हिजील’ ॲपच्या माध्यमातून 15 मार्चपासून ते आतापर्यंत प्राप्त 1  हजार 505 तक्रारींपैकी 1 हजार 329 तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्याने कारवाई करण्यात आल्याची तर तथ्य आढळले नसलेल्या उर्वरित 176 तक्रारी वगळण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी आणि त्याचा मागोवा घेण्यासाठी निवडणूक आयोगाच्या ‘सी-व्हिजिल’ ॲपला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्या माध्यमातून दाखल होणाऱ्या तक्रारींवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा स्तरावर सी-व्हिजिल कक्ष कार्यान्वीत आहे. 

Pandharpur News : जीपचा टायर फुटून भीषण अपघात; तीन महिला ठार, नऊ गंभीर जखमी

सी-व्हिजिल ॲपवर नागरिक माहिती, छायाचित्र, चित्रफीत अपलोड करुन आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करु शकतात. नागरिकांना आपली ओळख उघड न करता तक्रार दाखल करण्याची सोय या ॲपमध्ये आहे. अशा प्रकारे 15 मार्चपासून आतापर्यंत 1  हजार 505 तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी १ हजार ३२९ तक्रारींवर कारवाई तर उर्वरित 176 तक्रारी निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर वगळण्यात आल्या.

सी-व्हिजिल ॲपवर प्राप्त तक्रारी आणि कंसात कारवाई झालेल्या तक्रारी


आंबेगाव विधानसभा-23 (16), बारामती-54 (३०), भोर-3 (2), भोसरी-4 (3), चिंचवड-33 (22), दौंड-28 (19), हडपसर-47 (40), इंदापूर-47 (40), जुन्नर-36 (35), कसबापेठ-247 (223), खडकवासला-78 (71), खेड आळंदी-3 (1), कोथरूड-43 (32), मावळ-45 (30), पर्वती-258 (257), पिंपरी-11 (9), पुण कॅन्टोन्मेंट-109 (91), पुरंदर-11 (8), शिरूर-32 (15), शिवाजीनगर-71 (70) व वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात - 321 (315) अशा एकूण 1 हजार 505 तक्रारी प्राप्त झाल्या व 1 हजार 329 तक्रारींवर कारवाई झाली.

जिल्ह्यात चौथ्या  टप्प्यात मावळ, पुणे आणि शिरूर  लोकसभा मतदासंघाकरीता  सोमवार 13  मे रोजी मतदान होत आहे. जिल्ह्यात कुठेही आचारसंहितेचे उल्लंघन होत असेल तर नागरिकांनी तेथील छायाचित्र किंवा चित्रफीत काढावी आणि तत्काळ सी-व्हिजिल ॲपवर अपलोड करावे किंवा जिल्हा नियंत्रण कक्षाकडे आणि 18002330102 आणि 1950 टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहनही जिल्हा निवडणूक कार्यालयाने केले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply