
Pune : पांढऱ्या फॉर्च्युनर गाडीतून मोठा गांजाचा साठा विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली आणि पोलिसांनी सापळा रचला. पूर्ण तयारी करत संशयित वाहनाची वाट पाहत पोलिसांनी रात्र काढली. अखेर पहाटे गाडी दिसताच कारवाई करत एका तरुणाला पकडण्यात यश आलं. या कारवाईत तब्बल 40 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात प्रितम रविंद्र कुंजीर (वय 32, रा. धुमाळ मळा, म्हसोबा मंदिराजवळ, थेऊर) याला अटक करण्यात आली आहे.
रात्री गुप्तपणे सापळा रचला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथक गस्त घालत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांना गुप्त माहिती मिळाली की, पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्यूनर गाडीतून मोठ्या प्रमाणात गांजा विक्रीसाठी थेऊर परिसरात आणला जाणार आहे. माहिती मिळताच पोलिसांनी 10 मार्च मंगळवारी रोजी रात्री गुप्तपणे सापळा रचला. परिसरात पोलिसांनी नजर ठेवत संशयित वाहनाची वाट पाहण्यास सुरुवात केली.
40 लाखाचा मुद्देमाल जप्त
रात्रभर पोलिसांनी वाट पहिली पण गाडीचा पत्ता नव्हता. मात्र, पहाटे सुमारे पाचच्या सुमारास एक पांढरी फॉर्च्युनर त्या भागात येताना दिसली. पोलिसांनी तात्काळ गाडी थांबवून चालकाची चौकशी केली. सुरुवातीला काहीच संशयास्पद वाटत नव्हते, पण गाडीची तपासणी केली असता आत मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी प्रितम कुंजीर याला ताब्यात घेतलं.
या कारवाईत पोलिसांनी 53 किलो 14 ग्रॅम गांजा अंदाजे 30 लाख रुपये किमतीची फॉर्च्यूनर कार आणि मोबाईल फोन असा एकूण 40 लाख 70 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे आणि सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांच्या पथकाने केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
शहर
- Pune : पुण्यात 6 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या; आरोपीची फाशीची शिक्षा हायकोर्टाकडून रद्द
- SSC Paper Leak : दहावीचा गणिताचा पेपर फुटलाच नाही; एडिट फीचरचा गैरवापर करून विद्यार्थ्यांची फसवणूक, 18 वर्षीय तरुण अटकेत
- वैद्यकीय शिक्षण मंत्री माधुरी मिसाळ यांचा कॉलम:ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी ‘पल्स वैद्यकीय परिषद’ महत्त्वपूर्ण
- एन. रघुरामन यांचा कॉलम:वृद्धांना घोटाळ्यांपासून वाचवण्याची वेळ आलीय
महाराष्ट्र
गुन्हा
राजकीय
- मिरज पंचायत समितीत काँग्रेसची बाजी, भाजपच्या बालेकिल्ल्यात आघाडीचा धक्का
- आरती जेरथ यांचा कॉलम:‘आप’ नेत्यांच्या सुटकेनंतर काँग्रेस पक्ष चिंताक्रांत का?
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
इतर
- सरकार तुमचे बँक खाते गोठवू शकत नाही: आर्थिक संकटाच्या व्हायरल दाव्याची पडताळणी
- नाशिकमध्ये निवडणुकीतील पराभव जिव्हारी, राजकीय नेत्याचा युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला
- राज्यात उन्हाचा कडाका वाढला: उष्माघातापासून बचावासाठी आरोग्य विभागाकडून 'अॅडव्हायजरी' जारी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
- Pune- पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! २३ गावांच्या विकासासाठी ९५४ कोटींचा ‘बूस्टर डोस’
मनोरंजन
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
विडियो गॅलेरी

देश विदेश
- LPG टंचाई: सिलिंडर वाहनांना पोलीस सुरक्षा द्या आणि तात्काळ 'कंट्रोल रुम' उभारा; राज्य सरकारचे जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्देश
- गॅस टंचाई हाताळण्यासाठी केंद्र सरकार सरसावले: हॉटेल्सना पर्यायी इंधन, राज्यांना अतिरिक्त रॉकेल
- मुंबईत खलिस्तानी संघटनेच्या नावाने बॉम्बस्फोटाची धमकी; तपासानंतर अफवा असल्याचे स्पष्ट.
- जागतिक संघर्षात होर्मुझ सामुद्रधुनीतून मार्ग काढत, कच्चे तेल घेऊन ‘शेनलॉन्ग’ मुंबईत दाखल; भारताला तात्पुरता दिलासा.























Subscribe to my channel



