Pune Bridges : पुण्यातील ओढे-नाले, कालव्यांवरील पुलांचे होणार "स्ट्रक्चरल ऑडीट", सुरक्षेच्या दृष्टिकोनातून होणार पाहणी

Pune Bridges : पुणे महानगरपालिकेद्वारे शहरातील विविध भागांमध्ये असलेल्या ओढे-नाले आणि कालव्यांवर पूल बांधण्यात आले. पण या पुलांची पाहणी झालेली नाही. शहरातील पुलांची सद्य:स्थिती कशी आहे, त्यांमध्ये काय सुधारणा करणे अपेक्षित आहे हे जाणून घेण्यासाठी महानगरपालिकेद्वारे संबंधित पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे शहरात आंबील ओढा, भैरोबा नाल्यासह अनेक मोठे नाले-ओढे आहेत. मुठा कालवा शहरातून ग्रामीण भागामध्ये जातो. काही वर्षांपूर्वी महानगरपालिका प्रशासनाकडून छोटे-मोठे पूल तयार करण्यात आले. या पुलांमधून वाहतुकीची मोठी सोय झाली. अनेक पूल हे नागरी वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण आहेत. तरी यातील काही पूल हे जुने झाले आहेत. अशा जुन्या पुलांची स्थिती कशी आहे? ते प्रवासासाठी अनुकूल आहेत ना? त्यांची अवस्था कशी आहे? याची पाहणी महानगरपालिकेद्वारे होणार आहे. स्ट्रक्चरल ऑडीटनंतर पुढे त्यावर काम केले जाईल.

Pune Accident : वाघोलीत अपघात सत्र सुरूच, सलग दुसऱ्या दिवशी डंपरने दुचाकीस्वाराला उडवलं

यावर पुणे महानगरपालिका विशेष प्रकल्प विभागाचे प्रमुख अभियंता युवराज देशमुख यांनी माहिती दिली. ते म्हणाले, "ओढे-नाले, कालव्यांवरील सर्व पूल सध्या वाहतुकीसाठी खुले आहेत. पण त्यांची सध्याची स्थिती जाणून घेणे आवश्यक आहे. स्थिती खराब असल्यास संबंधित पुलाची डागडुजी केली जाईल. भविष्यातील धोके टाळण्याच्या दृष्टीने सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट केले जाणार आहे."

नदीवरील ३८ पैकी ११ पुलांचे काम पूर्ण; उर्वरित काम दुसऱ्या टप्प्यात होणार.

दोन वर्षांपूर्वी महानगरपालिकेने नदीवरील ३८ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट केले होते. .यासाठी पालिका प्रशासनाने ३५ कोटी रुपयांची तरतूद केली होती. एकूण ३८ पुलांपैकी ११ पुलांचे काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. उर्वरित २७ पुलांच्या कामासाठी अंदाजपत्रकात तरतूद केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये पुलांचे काम होणार असून त्यासाठीच्या निविदा प्रक्रिया सुरु केली जाणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply