Pune : पुण्यात थरार! भरधाव कार नाल्यात कोसळली; लष्करी अधिकाऱ्याच्या तत्परतेमुळे चालकाचे प्राण वाचले

Pune : संकटसमयी लष्करी जवान कशा प्रकारे देवदूत बनून मदतीला धावतात, याचा प्रत्यय पुन्हा एकदा पुणेकरांना आला आहे. वानवडी भागात घडलेल्या एका थरारक अपघातात एका लष्करी अधिकाऱ्याने केवळ तत्परता दाखवून कार चालकाचे प्राणच वाचवले नाहीत. तर त्याच्याकडील लाखो रुपयांची रोकडही सुरक्षितपणे परत करत प्रामाणिकपणाचे अनोखे उदाहरण घालून दिलं आहे.

भरधाव कार नाल्यात कोसळली
वानवडी परिसरातील गंगा सॅटेलाईट सोसायटीजवळ असलेल्या भैरोबा नाल्याच्या पुलावर ही घटना घडली. आज सकाळी 10च्या सुमारास एका चारचाकीवरील चालकाचा ताबा सुटला आणि ती कार पुलावरून थेट खाली नाल्यात कोसळली. अपघात इतका भीषण होता की गाडीचा चक्काचूर झाला आणि जखमी चालक गाडीतच अडकून पडला. हा अपघात झाला तेव्हा लष्करी अधिकारी नायर आशिष कुमार यादव योगायोगाने त्याच रस्त्यावरून जात होते. पुलावर जमलेली गर्दी पाहून त्यांनी गाडी थांबवली. खाली नाल्यात कार पडल्याचे आणि त्यात हालचाल होत असल्याचे दिसताच, त्यांनी जीवाची पर्वा न करता तात्काळ नाल्यात धाव घेतली.

Pune Crime : तळेगावात आईवरून शिवी दिल्याच्या रागातून तरुणाचं धक्कादायक कृत्य; पुणे हादरलं

पैशांंची पिशवी परत केली
स्थानिकांच्या मदतीने त्यांनी कारची काच फोडली आणि बेशुद्ध अवस्थेत असलेल्या चालकाला बाहेर काढले. चालकाच्या नाकातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. यावेळी आपल्या लष्करी प्रशिक्षणाचा वापर करत, यादव यांनी स्वतःच्या रुमालाने जखमेवर दाब दिला आणि रक्तस्राव थांबवून प्राथमिक उपचार केले. अपघातग्रस्त कारमध्ये सुमारे 1 ते 1.5 लाख रुपयांची रोकड होती. गडबडीच्या काळात ही रक्कम गहाळ होऊ शकली असती, पण यादव यांनी ती रक्कम स्वतःच्या ताब्यात सुरक्षित ठेवली. चालक शुद्धीवर आल्यानंतर पैशांची पिशवी त्यांनी प्रामाणिकपणे परत केली. त्यानंतर जखमीला एका टेम्पोच्या साहाय्याने रुग्णालयात हलवण्यात आले. लष्करी अधिकारी आशिष कुमार यादव यांच्या या धाडसी आणि प्रामाणिक वृत्तीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *