Pune : पुण्यातून बेपत्ता झालेला शाळकरी मुलगा मध्य प्रदेशात सापडला… पोलिसांनी ‘असा’ लावला शोध

Pune  : वडील रागविल्याने १४ वर्षीय शाळकरी मुलगा चार महिन्यांपूर्वी घरातून निघून गेला. मध्य प्रदेशातील जबलपूर रेल्वे स्थानकातील फेरीवाल्यांशी त्याने ओळख करून पाण्याच्या बाटल्या विकण्यास सुरुवात केली. गेले चार महिने मुलगा बेपत्ता असल्याने त्याचे आई-वडील हवालदिल झाले होते. अखेर पोलिसांनी मुलाचा शोध घेऊन त्याला पालकांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले असून, तपास पथकाला पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

भारती विद्यापीठ परिसरात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलाला वडील रागाविले. नववीत शिकणारा मुलगा चार महिन्यांपूर्वी घरातून निघून गेला. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याने वडिलांनी तक्रार नोंदविली होती. मुलाच्या वडिलांची सिक्युरिटी एजन्सी आहे. वडील रागविल्यानंतरमुलगा पुणे रेल्वे स्थानकातून रेल्वेने जबलपूरला गेला. तेथे त्याची कोणाशी ओळख नव्हती. रेल्वे स्थानकात त्याने फेरीवाल्यांशी मैत्री केली. प्रवाशांना पाण्याच्या बाटल्याची तो विक्री करु लागला. पाण्याच्या बाटल्याचे एक खोक्याची विक्री केल्यानंतर खोक्यामागे त्याला शंभर रुपये मिळू लागले. त्यामुळे त्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला.

Pune : खेडकरांना आयएएसमधून डच्चू; ‘यूपीएससी’ची कारवाई, भविष्यातही कायमस्वरुपी प्रतिबंध

मुलाचा शोध न लागल्याने पुणे पोलिसांनी त्याचे छायाचित्र अन्य राज्यातील पोलिसांना पाठविले. मुलाची माहिती मिळाल्यास त्वरीत द्यावी, अशी विनंती पोलिसांनी केली. बेपत्ता झालेला मुलगा जबलपूर रेल्वे स्थानकात पाण्याच्या बाटल्यांची विक्री करत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले यांना मिळाली. येवले यांनी याबाबतची माहिती परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त नंदिनी वग्यानी-पराजे, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांना दिली. त्यानंतर उपनिरीक्षक येवले, फिरोज शेख, हर्षल शिंदे जबलपूरला पोहोचले. रेल्वे स्थानकातून मुलाला ताब्यात घेतले. मुलाला पालकांच्या ताब्यात देण्यात आले. चार महिन्यानंतर मुलगा घरी परतल्याने पालकांच्या डाेळ्यात आनंदाश्रृ तरळले. शाळकरी मुलाचा शोध घेणाऱ्या तपास पथकाला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पाच लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply