Pune News: पुणेकरांचे पाणी महागले! टँकरच्या पाण्यासाठी मोजावे जागणार जास्त पैसे, नागरिकांना फटका

 

Pune : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुणेकरांचे पाणी महागले आहे. आता पुणेकरांना पिण्याच्या पाण्याच्या टँकरसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे. त्यामुळे पुणेकऱ्यांच्या खिशावर ताण आला आहे. पुणे महानगर पालिकेने पाण्याच्या टँकरच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना याचा मोठा फटका बसणार आहे. या निर्णयामुळे पुणेकरांमध्ये नाराजी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेने खासगी टँकरचालकांना पुरविण्यात येणाऱ्या पाण्याच्या टँकरच्या दरात पाच टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पाण्यासाठी खासगी टँकरवर अवलंबून असलेल्या नागरिकांच्या खिशावर अधिकचा भार पडण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेच्या मर्यादित पाणीपुरवठ्यामुळे पर्वती, वडगाव शेरी, धायरी, रामटेकडी, चतु:शृंगी, पद्मावती आणि पटवर्धन बाग या ठिकाणी मोफत पाण्याचा पुरवठा टँकरद्वारे केला जातो.

पुण्यातील नागरिकांकडून टँकरची मागणी वाढत असताना मे महिन्यात या मागणीत आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. आत्तापर्यंत दहा हजार लिटर पाण्याचा टँकर खासगी टँकरचालकांना ६६६ रुपयांना मिळत होता. या टँकरचा दर आता ६९९ रुपये इतका झाला आहे. त्यामुळे आता टँकरचे पाणी घेणाऱ्या नागरिकांना पाण्यासाठी जास्त पैसे द्यावे लागणार आहे. वाढती महागाई आणि पाणीपुरवठ्यावर होणारा खर्च लक्षात घेऊन दरवाढ करण्याची गरज असल्याचे स्पष्टीकरण महापालिकेने दिले आहे.

Mumbai Crime: शिक्षकाचं धक्कादायक कृत्य! शाळेतच महिला शिक्षिका अन् विद्यार्थिनींचा करायचा विनयभंग, रात्री-अपरात्री कॉल

दरम्यान, पुण्यातील धरणाच्या पाणी साठ्यात घट झाली आहे. वाढत्या उन्हामुळे पिण्याच्या पाण्याच्या मागणीत वाढ झाली असून पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील पाणीसाठ्यावर त्याचा परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत मिळून १०.९६ टीएमसी एवढा पाणीसाठा आहे. शहराला पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चार धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे जलसंपदा विभागाने पालिकेला काटकसरीने पाणी वापरण्याच आवाहन केलं आहे.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply