Pune : जागतिक महिला दिन: कबड्डीपटू ते महिला पोलिस कर्मचारी सोनाली हिंगे या तरुणीचे दामिनी पथकातील कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक

Pune : आज प्रत्येक क्षेत्रात महिला मोठ्या प्रमाणावर काम करताना दिसत आहे.तर आज जागतिक महिला दिनानिमित्ताने विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणार्‍या महिलांचा अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून विशेष सन्मान केला जात आहे.तर आज आपण अशाच एका यशस्वी तरुणीशी संवाद साधणार आहोत,ती म्हणजे पुणे पोलीस विभागातील शिवाजीनगर पोलिस स्टेशनमधील दामिनी पथकात काम करणारी सोनाली हिंगे या तरुणीचा पोलीस कर्मचारी होण्यापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे.सोनाली हिंगे या कबड्डीपटू ते महिला पोलीस कर्मचारी आणि दामिनी पथकातील आजवरचा अनुभव त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत.

यावेळी सोनाली हिंगे म्हणाल्या, मी सर्व सामान्य कुटुंबात लहानाची मोठी झाली.मला लहानपणापासून कबड्डीची आवड होती.तीच आवड जोपासत, गावपातळीपासून राज्य पातळीपर्यंत होणार्‍या कबड्डीच्या स्पर्धामध्ये सहभागी होत राहिले,त्या प्रत्येक स्पर्धेत मी पदक जिंकत राहिले.त्या प्रत्येक स्पर्धेच्या वेळी मला माझ्या कुटुंबियांनी मोलाची साथ दिल्याने क्रिडा क्षेत्रात नाव करू शकले.पण दुसर्‍या बाजूला खेळासोबत अभ्यास केला पाहिजे,चांगल मार्क मिळव,असे कुटुंबातील सांगत आले आणि मी बी कॉम केले आहे आणि आता एमफील च शिक्षण घेत आहे.

2012/13 च्या दरम्यान मी स्पर्धा परीक्षा देण्याची तयारी करीत होती. मी अभ्यास केला,पण केवळ अर्ध्या मार्क ने माझी पीएसआय होण्याची संधी हुकली, त्याबद्दल खूप वाईट वाटले.पण आपण पोलिस व्हायचे,स्वप्न पाहिले होते आणि पुढील सहा महिन्यात पुणे शहर पोलिस भरती होणार असल्याची माहीती मिळाली. त्यामुळे त्यावेळी खूप कष्ट घेऊन,पुणे शहर पोलीसमध्ये भरती झाले.कुटुंबियांना खूप आनंद झाला आणि माझ स्वप्न पूर्ण झाल्याचे एक समाधान मिळाले, आपणाला नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळणार आहे.मला पुणे पोलिस सेवेत येऊन 12 वर्षांचा कालावधी होऊन गेला आहे.

Pimpri : पिंपरीत एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी चार पिस्तूल जप्त

त्या कालावधीत मी वाहतूक विभाग, कोंढवा पोलिस स्टेशन आणि आता शिवाजीनगरमध्ये काम करीत आहे. शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये रुजू होऊन जवळपास दोन वर्षाचा कालावधी झाला.माझ्याकडे शिवाजीनगर भागातील दामिनी पथकाची जबाबदारी देण्यात आली आहे.या दामिनी पथकाच्या माध्यमांतून तरुणी,महिला,लहान मुल,जेष्ठ नागरिक यांच्या समस्या असल्यास सोडविल्या जातात.तसेच शाळा, महाविद्यालयामध्ये गुड टच बॅट् टच बाबत वेळोवेळी लेक्चर देण्यात आले आहे.त्या माध्यमातून अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.

तर आमच्या शिवाजीनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणारे एसटी स्टँड,पुणे मनपा पीएमपीएमएल स्टॉप, शाळा, महाविद्यालय,तसेच काहीसा झोपडपट्टी भागात आमच्या दामिनी पथकाकडून दररोज वेगवेगळ्या ठिकाणी गस्त घालण्याचे काम सुरू झाले.या संपूर्ण दोन वर्षाच्या कालावधीत दररोज सरासरी चार ते पाच फोन हे तरुणी,महिला,ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या बाबतीत असतात, तर आम्हाला संबधित पीडित व्यक्तीचा कॉल आल्यास आम्ही पुढील काही मिनिटात घटनास्थळी धाव घेऊन त्यांची समस्याच दुर करीत असून आजवर जवळपास 75 हून नागरिकांना आलेल्या समस्या सोडविण्यात यश आले आहे किंवा त्रास देणार्‍या व्यक्तीवर विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

गुड टच आणि बॅट् टच च्या लेक्चरमुळे ‘ती’ घटना समोर आली

पुणे शहर पोलीस विभागात प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये दामिनी पथक आहे. 32 पोलिस स्टेशनमध्ये 50 महिला कर्मचारी आहेत.आम्ही शाळा, महाविद्यालय,गुड टच आणि बॅट् टच याची माहिती दिली जाते.तसेच तरुणी, महिला,जेष्ठ नागरिकांना कोणी त्रास देत असल्यास संबधीत व्यक्तीने नियंत्रण कक्षाला माहीती देताच आम्ही घटना स्थळी जाऊन दाखल होत,योग्य ती कार्यवाही करत असतो.तर आजवर मी जवळपास 75 घटना सोडविल्या आहेत. त्यामध्ये सर्व प्रकाराच्या घटना आहेत.या घटनांपैकी काही घटना सांगू इच्छिते की, रेल्वे स्थानक परिसरात रात्रीच्या वेळी एका तरुणीचा एक तरुण पाठलाग करून तिला त्रास देत होता, त्यावेळी त्या तरुणीने मला फोन केला आणि ताई तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये लेक्चर दिले होते.आपली भेट झाली होती.तर मला एक तरुण पाठलाग करून त्रास देत असल्याचे सांगितले.त्यावर तिला मी धीर देण्याच काम केले आणि पुढील काही मिनिटात घटनास्थळी दाखल होऊन,संबधीत तरुणाला ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आली. तर दुसर्‍या घटनेत आम्ही अनेक शाळा, महाविद्यालयामध्ये गुड टच आणि बॅट् टचचे लेक्चर् दिल्याने,एका चार वर्षाच्या चिमुकलीवर 71 वर्षाच्या जेष्ठ नागरिकांनी विनयभंग केल्याची बाब समोर आली.त्याबाबत सांगायचे झाल्यास, 71 वर्षीय जेष्ठ नागरिक एका प्रतिष्ठित कुटुंबातील आहे.त्यांचे कुटुंबातील सदस्य परदेशात राहण्यास असून ते राहत असलेल्या सोसायटीमध्ये 9 वर्षाची चिमुकली संध्याकाळच्या वेळेला खेळत असताना, 71 वर्षीय जेष्ठ नागरिकांनी तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि याबाबत आमच्याकडे या घटनेची तक्रार प्राप्त होताच, आम्ही त्या जेष्ठ नागरिकांना विरोधात कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply