Pune News: रात्रीच पुणे शहर होणार चकाचक, महापालिकेचा नेमका प्लान काय?

Pune : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. आता पुणे शहर रात्रीच चकाचक होणार आहे. त्यामुळे पुण्यातील रस्त्यावर कचरा दिसणार नाही. यासाठी पुणे महानगर पालिकेने जबरदस्त प्लान केला आहे. पुणे शहर सकाळी स्वच्छ असावे यासाठी महापालिका प्रशासनाने रस्त्यावरील कचरा रात्रीच उचलण्यासाठी नियोजन सुरु केले आहे. रात्रपाळीमध्ये काम करणारे कर्मचारी, वाहने याचे नियोजन पालकेकडून सुरु केले आहे.

एकीकडे बेशिस्त नागरिक अन् दुसरीकडे सकाळी कचरा उचलण्यास प्रशासनाला उशीर होत असल्याने पुणे शहरात कचरा दिसत आहे. शहरामध्ये ठिकठिकाणी कचरा पडल्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरते. त्यामुळे पुणेकर हैराण झाले आहेत. आता पुणेकरांची घाण आणि दुर्गंधीपासून सुटका होणार आहे. सकाळ होण्यापूर्वीच पुणे शहर स्वच्छ झाल्यास नागरिकांना चांगले वातावरण अनुभवता येणं शक्य होणार आहे.

रात्रीच पुणे शहर स्वच्छ करण्याचा मुद्दा पुढे आला आहे. पुणे महापालिकेकडे कचरा उचलण्यासाठी नवीन ८१ गाड्या उपलब्ध असणार आहेत. रात्रीच्या वेळी रस्त्यांवर टाकण्यात येणारा कचरा रात्रीच उचलण्यात यावा यासाठी महापालिका प्रशासन नियोजन करत आहे. कचरा रात्री उचलला जावा यासाठी चालक, आणि कर्मचारी यांची उपलब्धता येत्या आठवड्याभरात होईल.

Ulhasnagar Crime : कार दारात लावल्याने शेजाऱ्याला बेदम मारहाण; उल्हासनगराच्या पंजाबी कॉलनीतील घटना

पुणे शहरातील मंडई, तुळशीबाग, टिंबर मार्केट, खाऊगल्ल्या आणि महत्त्वाच्या बाजारपेठा या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी असते. या परिसरात रस्तावर ठिकठिकाणी मोठ्याप्रमाणात कचरा पडल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे दुर्गंधी पसरते. नागरिकांना वारंवार कचरा करू नये असे आवाहन केले जाते. यासाठी कारवाई देखील केली जाते. पण पुण्यात परिस्थिती जैसे थे असल्याचेच पाहायला मिळते. या कचऱ्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होतो. अशात कचरा वेळेमध्ये उचलला जात नसल्यामुळे पुणे शहर घाण होत चालले आहे. यावर आता महानगर पालिकेने उपाय शोधून काढला आहे. रात्रीमध्येच पुणे शहर स्वच्छ होणार आहे.

पुणे महापालिकेकडे कचरा उचलण्यासाठी नवीन ८१ गाड्या उपलब्ध झाल्या आहेत. क्षेत्रीय कार्यालयांच्या मागणीनुसार या गाड्यांचे वाटप करण्यात आले आहे. पुणे महानगर पालिकेकडे जुन्या आणि नवीन अशा ३५१ घंटागाड्या उपलब्ध झाल्या आहेत. रात्रीच्या वेळी रस्त्यांवर टाकण्यात येणारा कचरा रात्रीच उचलण्यात यावा यासाठी प्रशासन योग्य नियोजन करत आहे. कचरा रात्री उचलला जावा यासाठी चालक आणि कर्मचारी यांची उपलब्धता येत्या आठवड्याभरात होईल. यानंतर रात्रीच कचरा उचलण्यात येणार आहे. पुढील आठ दिवसांत याची अंमलबजावणी सुरु होईल, असे घनकचरा विभागाचे प्रमुख संदीप कदम यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply