Pune : पुरंदर विमानतळ ‘असा’ उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा ! विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ घेतली सभा

Pune : ‘पुरंदर येथील नियोजित विमानतळ उभारताना कोणाचेही नुकसान होऊ देणार नाही, कोणावर जबरदस्ती न करता हा विमानतळ उभारला जाईल,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पुरंदर विमानतळासाठी अडीच हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून, या विमानतळामुळे शेतकऱ्यांचा फायदा होऊन रोजगारनिर्मिती होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुरंदर – हवेली मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री शिंदे यांची जाहीर सभा झाली. त्यामध्ये ते बोलत होते. या वेळी माजी आमदार अशोक टेकवडे, ममता शिवतारे, माजी आमदार भगवान साळुंखे, जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, बाबा जाधवराव, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, संदीप हरपळे, पंकज धिवार, नीलेश जगताप आदी उपस्थित होते.

Mumbai : सोहळ्यांचा पालिकेला भुर्दंड; लोकसभा, विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी २८ कोटींचा खर्च

पुरंदरचा गड शत्रूच्या हातात पडता कामा नये. आमदार, खासदार नसतानाही विजय शिवतारे यांनी अनेक योजना पुरंदर विधानसभेतील जनतेसाठी आणल्या. सासवड पाणीपुरवठा योजनेसाठी १७८ कोटी, जेजुरी पाणीपुरवठ्यासाठी ७८ कोटींचा निधी आणला. या भागाचा अधिक वेगाने विकास करण्यासाठी त्यांना विधानसभेत पाठवा, असे आवाहन शिंदे यांनी मतदारांना केले.

पुरंदरचा गड शत्रूच्या हातात पडता कामा नये. आमदार, खासदार नसतानाही विजय शिवतारे यांनी अनेक योजना पुरंदर विधानसभेतील जनतेसाठी आणल्या. सासवड पाणीपुरवठा योजनेसाठी १७८ कोटी, जेजुरी पाणीपुरवठ्यासाठी ७८ कोटींचा निधी आणला. या भागाचा अधिक वेगाने विकास करण्यासाठी त्यांना विधानसभेत पाठवा, असे आवाहन शिंदे यांनी मतदारांना केले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की राज्य सरकारने ‘लाडकी बहीण योजना’ जाहीर केल्यानंतर काही सावत्र, कपटी भाऊ न्यायालयात गेले. त्यांना जनाची नाही तरी मनाची लाज वाटायला हवी होती. आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडलो. सरकार पाडायला हिंमत लागते. सत्तेतून बाहेर पडलो. मात्र, विचारधारा सोडली नाही. गरिबांची जाण असलेले महायुतीचे सरकार आहे.

‘पुरंदरचा विमानतळ, गुंजवणीचे पाणी, एमआयडीसीचे विस्तारीकरण, नियोजित आयटी पार्क, हे रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करा. यासाठी मतदारांनी महायुतीच्या पाठीशी उभे राहावे,’ असे आवाहन विजय शिवतारे यांनी केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply