PM Modi Pune Visit: पुणेकरांसाठी मोठी बातमी! PM मोदींच्या दौऱ्यामुळे आज वाहतुकीत बदल, 'हे' रस्ते राहणार बंद

Pune  : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (दि २६) पुणे दौऱ्यावर येत असून तीन ठिकाणी भेटी देणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात तात्पुरत्या स्वरुपात दुपारी तीननंतर वाहतूक बदल करण्यात आला आहे. काही ठिकाणी रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत, तर काही ठिकाणची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.

असा आहे वाहतूक बदल
- सावरकर पुतळा चौक ते सारसबाग, पुरम चौक दरम्यान सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
- जेधे चौक ते सातारा रस्ता वाहनांसाठी प्रवेश बंद असणार आहे. त्यामुळे टिळक रस्ता व छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याने येणाऱ्या वाहनांनी जेधे चौकातून डावीकडे वळण घेऊन सेव्हन लव्हज चौक उजवीकडे वळण जावे. सेव्हन लव्हज चौक ते जेधे चौक प्रवेश बंद ठेवला आहे. वाहन चालकांनी सेव्हन लव्हज चौक डावीकडे वळण घेऊन वखार महामंडळ उजवीकडे वळुन सातारा रस्त्यावरुन इच्छित स्थळी जावे.
- व्होल्गा चौक ते जेधे चौक रस्ता बंद ठेवला जाणार आहे. त्यानुसार व्होल्गा चौक डावीकडे वळण घेवून सावरकर चौक मार्गे इच्छितस्थळी जावे.

Pune : PM मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर! पुणे मेट्रोसह 'या' १२ प्रकल्पांचे होणार लोकार्पण, कसा असेल दौरा?

सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानक परिसर
कामगार पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान दोन्ही बाजूने प्रवेश बंद (रानडे पथ) ठेवण्यात येणार आहे. यावेळी वाहन चालकांनी कामगार पुतळा ते शाहीर अमर शेख चौक मार्गे, छत्रपती शिवाजी महाराज चौक सरळ मंगला सिनेमा समोरून काँग्रेस भवन रस्त्यावरून जावे.
- तोफखाना चौक ते कोर्टाकडे प्रवेश बंद ठेवला असून वाहन चालकांनी तोफखाना चौक डावीकडे वळण घेऊन जावे.

आंबिल ओढा परिसर
- ना. सी. फडके चौक ते नाथ पै चौक दरम्यानचा रस्ता बंद असेल.
- बाबुराव घुले पथ पथावरून टिळक कॉलेजचे पुढे आंबिल ओढा जंक्शनकडे प्रवेश बंद असून, टिळक कॉलेज चौकामधुन उजवीकडे वळन घेऊन जॉगर्स पार्क रस्त्यावरून शास्त्री रस्तावर येऊन इच्छितस्थळी जावे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply